भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) या वर्षाअखेरीस सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ नुकताच दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटच्या दहशतीखाली हा दौरा पार पडणार आहे. कसोटी संघाचा नवनियुक्त उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही. आता त्याच्या जागी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सलामीवीर केएल राहुल याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. (KL Rahul Test Vice Captain)
NEWS – KL Rahul named vice-captain of Test team for South Africa series.
KL Rahul replaces Rohit Sharma as vice-captain, who was ruled out of the Test series owing to a hamstring injury.
More details here – https://t.co/7dHbFf74hG #SAvIND | @klrahul11 pic.twitter.com/6pQPTns9C7
— BCCI (@BCCI) December 18, 2021
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल.
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – २६ ते ३१ डिसेंबर, सेंचूरियन
दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना – ११ ते १५ जानेवारी, केपटाऊन
वनडे मालिका
पहिला वनडे सामना – १९ जानेवारी २०२२, पर्ल
दुसरा वनडे सामना – २१ जानेवारी, २०२२, पर्ल
तिसरा वनडे सामना – २३ जानेवारी, केपटाऊन
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/gautam-gambhir-appointed-as-the-mentor-of-lucknow-ipl-franchise-for-ipl-2022/
https://mahasports.in/joe-root-complete-1600-test-runs-in-2021-year/