---Advertisement---

टीम इंडियाच्या वाघाची बॅट पुन्हा तळपणार! जड्डूसह ‘हा’ दिग्गजही करतोय बांगलादेशविरुद्ध कमबॅक

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 7:40 PM
Ravindra-Jadeja
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 या मोठ्या स्पर्धेनंतर भारतीय संघाला बांगलादेश आणि न्यूझीलंड संघाचा दौरा करायचा आहे. भारताला न्यूझीलंड दौऱ्यात 3 टी20 आणि 3 वनडे मालिका खेळायच्या आहेत. तसेच, बांगलादेशविरुद्ध 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. भारत सर्वप्रथम नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा दौरा करेल. त्यानंतर भारताला डिसेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करायचा आहे. बांगलादेशच्या या दौऱ्यासाठी भारतीय संघात दोन महत्त्वाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघ रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळेल. या संघात संधी मिळालेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जडेजाला बांगलादेशविरुद्धच्या वनडे आणि कसोटी अशा दोन्ही मालिकांमध्ये संधी मिळाली आहे, तर पुजाराला फक्त कसोटी मालिकेसाठी संघात स्थान दिले गेले आहे. याव्यतिरिक्त केएस भरत यालाही कसोटी मालिकेत खेळण्याची संधी दिली आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा 18 ते 30 नोव्हेंबरदरम्यान असणार आहे. त्यानंतर भारतीय संघ 4 ते 22 डिसेंबरदरम्यान बांगलादेशविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिका खेळेल.

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/ यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

विशेष म्हणजे, पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची या दोन्ही दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाहीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 अन् वनडे मालिकेसाठी दोन संघांची निवड, दोन महत्त्वाच्या खेळाडूंना डच्चू
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---