Loading...

बीसीसीआयच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा; एमएस धोनीला करारातून वगळले

गुरुवारी (16 जानेवारी) बीसीसीआयने ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वरिष्ठ भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही मानधनाच्या 4 श्रेणी करण्यात आल्या आहेत. यात अ+, अ, ब, आणि क अशा श्रेणी असतील.

Loading...

या करारानुसार अ+ श्रेणीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी 7 कोटी रुपयांचे मानधन मिळेल.

मात्र मागीलवर्षी अ श्रेणीत समावेश असलेल्या एमएस धोनीला यावर्षी बीसीसीआयच्या या करारातून वगळण्यात आले आहे. तो जूलै 2019 पासून एकही सामना खेळलेला नाही.

त्याचबरोबर बीसीसीआयने यावर्षी अ श्रेणीमध्ये 11 खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे.

Loading...

यांच्यातील केएल राहुलला यावर्षी अ श्रेणीत बढती मिळाली आहे. तो मागीवर्षी ब श्रेणीत होता. त्याच्याव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना अ श्रेणीत स्थान कायम राखण्यात यश आले आहे. या अ श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी एवढे वार्षिक मानधन मिळणार आहे.

तसेच ब श्रेणीमध्ये वृद्धिमान सहाला बढती मिळाली आहे. तो मागीलवर्षी क श्रेणीत होता. त्याचबरोबर मयंक अगरवालचाही यावर्षी बीसीसीआयच्या करारात समावेश झाला असून त्याला ब श्रेणीत सालील करण्यात आले आहे.

या दोघांव्यतिरिक्त ब श्रेणीत उमेश यादव,  युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या कायम आहेत.  या श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी असे वार्षिक मानधन दिले जाणार आहे.

Loading...
Loading...

त्याचबरोबर क श्रेणीमध्ये एकूण 8 क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी एवढे वार्षिक मानधन मिळणार आहे. या श्रेणीत श्रेयस अय्यर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि दिपक चाहर यांना स्थान मिळाले आहे.

त्यांच्याशिवाय या श्रेणीत केदार जाधव, मनिष पांडे आणि हनुमा विहारी यांना त्यांचे स्थान कायम राखण्यात यश मिळाले आहे.

Loading...

तसेच दिनेश कार्तिक, अंबाती रायडू आणि खलील अहमद यांना या करारातून वगळण्यात आले आहे.

ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी असणाऱ्या वार्षिक मानधन करारात एकूण 27 पुरुष क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

या पुरुष क्रिकेटपटूंचा झाला वार्षिक मानधन करारात समावेश-

अ+ श्रेणी (7 कोटी) – विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा

अ श्रेणी(5 कोटी) – आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत, केएल राहुल.

ब श्रेणी (3 कोटी) – वृद्धिमान सहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयंक अगरवाल

क श्रेणी(1 कोटी) – केदार जाधव, मनीष पांडे, हनुमा ​​विहारी, नवदीप सैनी, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.

You might also like
Loading...