दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन संघात 15 सप्टेंबरपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेनंतर 2 ऑक्टोबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे.
पण कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिका बीसीसीआयच्या अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध 3 दिवसीय सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पार पडेल. या सराव सामन्यासाठी अध्यक्षीय एकादश संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.
तसेच या अध्यक्षीय एकादश संघात बीसीसीआयने मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड यांचा समावेश करण्यात आला आहे.
केएस भरतचा यष्टीरक्षक म्हणून समावेश केला आहे. तर गोलंदाजांच्या फळीत जलज सक्सेना, धर्मेंद्रसिंग जडेजा हे फिरकीपटू तर आवेश खान, इशान पोरेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या 3 दिवसीय सराव सामन्यासाठी असा आहे बीसीसीआयचा अध्यक्षीय एकादश संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, केएस भारत (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, धर्मेंद्रसिंग जडेजा, आवेश खान, ईशान पोरेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा गिरिश एर्नाक पहिला महाराष्ट्रीयन खेळाडु
–जो रुटने हा मोठा पराक्रम करत मिळवले कूक, तेंडूलकर सारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान
–विंडीज विरुद्ध हॅट्रिक घेत या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने रचला इतिहास