रणजी ट्रॉफी २०२२ च्या बाद फेरीचे सामन्यांसाठी बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. आता बाद फेरीतील सर्व सामने दोन दिवस उशिरा सुरू होणार आहेत. उपांत्यपूर्व फेरीचे सामने सहा जूनपासून सुरू होतील. तसेच अंतिम सामने २२ जूनपासून सुरू होणार आहेत.
स्पर्धेचा अंतिम सामना बेंगलोर स्थित एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बीसीसीआयने सर्व राज्यांच्या क्रिकेट बोर्डाला सांगितले आहे की, उपांत्य सामने आता १२ जूनऐवजी १४ जूनपासून सुरू होतील. चालू हंगामात बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या संघांनी बाद फेरीत स्वतःचे स्थान पक्के केले आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम सुरू होण्यापूर्वी रणजी ट्रॉफीचे लीग स्टेजटे सामने खेळले गेले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रणजी ट्रॉफी २०२२ च्या बाद फेरीचे सुधारित वेळापत्रक
उपांत्यपूर्व सामने ६ जूनपासून ते १० जूनपर्यंत खेळले जाणार
पहिला उपांत्यपूर्व सामना – बंगाल विरुद्ध झारंखड
दुसरा उपांत्यपूर्व सामना – मुंबई विरुद्ध उत्तराखंड
तिसरा उपांत्यपूर्व सामना – कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश
चौथा उपांत्यपूर्व सामना – पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश
उपांत्य सामने १४ जून ते १८ जून यादरम्यान खेळले जाणार
अंतिम सामना २२ जून ते २६ जूनदरम्यान खेळला जाणार
असे होते जुने वेळापत्रक
रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) च्या जुन्या वेळापत्रकानुसार बाद फेरीचे सामने ४ जूनपासून सुरू होणार होते. बीसीसीआयने सांगितल्यानुसार आयपीएल संपल्यानंतर या सामन्यांना सुरूवात होणार होती. आता सुधारित वेळापत्रकानुसार सर्व सामने दोन दिवस उशिरा सुरू होतील. बीसीसीआयने वेळापत्रक बदलण्यामागे कसलेही कारण मात्र स्पष्ट केले नाहीये. हे सर्व सामने बायो बबलमध्ये खेळले जाणार आहेत, पण खेळाडूंना विलगीकरणात राहण्याची कसलीही आवश्यकता नसेल. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव आल्यानंतर खेळाडू सरळ त्यांच्या संघांसोबत सहभागी होऊ शकणार आहेत. परंतु प्रेक्षकांना मात्र स्टेडियममध्ये परवानगी नसेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटच्या तीन प्रकारात शतक करणारा रोहित तीन भारतीयांपैकी एक
‘आमचा हकुना मटाटा बनण्यासाठी धन्यवाद’, रितीकाने रोहितचे अनसीन फोटो शेअर करत केले हटके बर्थडे विश
एकदा नाही, दोनदा नाही तर पाच वेळा हिटमॅनने ‘या’ बलाढ्य संघांना धू धू धुतले