भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या प्लेऑफचे वेळापत्रक रविवारी(२५ ऑक्टोबर) जाहीर केले आहे. याआधी बीसीसीआयने केवळ ३ नोव्हेंबर्यंतचे साखळी फेरीचे वेळापत्रक घोषित केले होते. पण आता प्लेऑफचेही वेळापत्रक घोषित झाले आहे.
प्लेऑफमधील क्वालिफायर १ चा सामना दुबईमध्ये ५ नोव्हेंबरला होणार आहे. तर एलिमिनेटरचा सामना ६ नोव्हेंबरला अबु धाबीमध्ये होईल. तसेच क्वालिफायर २ चा सामना अबु धाबीमध्येच ८ नोव्हेंबरला होईल. अंतिम सामना १० नोव्हेंबरला दुबईमध्ये होणार आहे. यंदा प्रथमच आयपीएलचा अंतिम सामना रविवारी होणार नाही. प्लेऑफचे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होतील.
महिला आयपीएलचेही वेळापत्रक घोषित
याबरोबरच बीसीसीआयने महिला टी२० चॅलेंजचे म्हणजेच महिला आयपीएलच्या सामन्यांच्या वेळापत्रकाचीही घोषणा केली आहे. ही स्पर्धा आयपीएलच्या प्ले ऑफ दरम्यान युएईमध्येच ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधना आणि मिताली राज अनुक्रमे सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर्स आणि वेलोसिटी संघाच्या कर्णधार असतील.
या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी संघात ४ नोव्हेंबरला होईल, तर वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स असा ५ नोव्हेंबरला दुसरा सामना होईल. तिसरा सामना ७ नोव्हेंबरला सुपरनोवा विरुद्ध ट्रेलब्लेझर्स यांच्यात होईल. यानंतर गुणतालिकेतील पहिल्या २ संघात ९ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. हे सर्व सामने शारजाहमध्ये होणार आहेत.
तसेच ४ आणि ६ नोव्हेंबरला होणारा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. तर ५ नोव्हेंबरला होणारा सामना दुपारी ३.३० वाजता सुरु होईल. तसेच अंतिम सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल.
असे आहे आयपीएलच्या प्लेऑफचे वेळापत्रक –
५ नोव्हेंबर – क्वालिफायर १ (गुणतालिकेतील क्रमांक १ चा संघ विरुद्ध क्रमांक २ चा संघ), दुबई, वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
६ नोव्हेंबर – एलिमिनेटर (गुणतालिकेतील क्रमांक ३ चा संघ विरुद्ध क्रमांक ४ चा संघ), अबु धाबी, वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
८ नोव्हेंबर – क्वालिफायर २ (क्वालिफायर १चा पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजेता संघ), अबु धाबी, वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
१० नोव्हेंबर – अंतिम सामना ( क्वालिफायर १चा विजेता संघ विरुद्ध क्वालिफायर २ चा विजेता संघ), दुबई, वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
महिला टी२० चॅलेंजचे वेळापत्रक –
४ नोव्हेंबर – सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी, शारजाह, वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
५ नोव्हेंबर – वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, शारजाह, वेळ : दुपारी – ३.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
७ नोव्हेंबर – ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवा, शारजाह, वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
९ नोव्हेंबर – अंतिम सामना, शारजाह वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा; गुणतालिकेत वरच्या क्रमांकावर घेतली उडी
Video: युझवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्रीने दुबईत बीचवर केला भन्नाट डान्स
‘हार्दिक’ नावाचं वादळ ! अवघ्या २० चेंडूत झळकावले विक्रमी अर्धशतक
ट्रेंडिंग लेख-
-चौकारांशिवाय अर्धशतक…!! आयपीएलमध्ये या ५ फलंदाजांनी केलाय हा कारनामा
-आयपीएल२०२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारे ४ खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी