भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरूण धुमाळ यांनी यावर्षाच्या शेवटी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल आपले मत स्पष्ट केले आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना धुमाळ म्हणाले की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ २ आठवडे क्वारंटाईन होण्यासाठी तयार आहे.
धुमाळ (Arun Dhumal) पुढे म्हणाले की, “इतर कोणताही पर्याय नाही. भारतीय संघाला क्वारंटाईन व्हावेच लागेल. जर तुम्हाला क्रिकेट पुन्हा सुरु करायचे असेल तर हा निर्णय घ्यावा लागेल. २ आठवड्यांचा कालावधी लॉकडाऊन (Lockdown) इतका मोठा नाही.”
ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत १ कसोटी सामना वाढविण्याच्या प्रस्तावावर धुमाळ म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाला निधी हवा आहे. तसेच हा निधी वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांपेक्षा कसोटीमधून अधिक मिळतो.
भारतीय संघाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India tour of Australia) ४ कसोटी आणि ३ वनडे मालिका खेळायच्या आहेत. यादरम्यान भारतीय संघाला ३२३ कोटी रुपयांनी बनलेल्या नव्या ओव्हल हॉटेलमध्ये ठेऊ शकतात.
१३८ खोलींनी बनलेल्या या हॉटेलला आयसोलेशन सेंटर बनवण्याचा प्रस्ताव एसएसीएचे प्रमुख कीथ ब्रेथशा यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख केविन रॉबर्ट्स यांच्यासमोर ठेवला होता. हे ओव्हल हॉटेल सप्टेंबरमध्ये चालू केले जाऊ शकते.
ऑस्ट्रेलिया हा दौरा होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहे. कारण हा दौरा जर रद्द झाला तर ऑस्ट्रेलियाला सामनेप्रसरणामार्फत मिळणाऱ्या २३०६ कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो.
यावर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाबद्दल धुमाळ म्हणाले की, “यावर कोरोना व्हायरसचा धोका आहे. या स्पर्धेचे आयोजन होणे सध्यातरी कठीण आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरसमुळे आपल्या सीमा ६ महिन्यांसाठी बंद केल्या आहेत. अशामध्ये कोणत्याही संघाला तेथे जाता येणार नाही. तरीही आनंदाची बातमी आहे की, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मे महिन्याच्या शेवटी सराव करण्यास सुरुवात करू शकतात. अशामध्ये देशात क्रिकेटचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.”
धुमाळ यांनी आयपीएलवरही (IPL) आपले मत स्पष्ट केले. ते म्हणाले की, “आतापर्यंत आयपीएलसाठी कोणताही आराखडा किंवा योजना तयार करण्यात आलेली नाही. स्पर्धेसाठी परदेशी खेळाडूंनाही भारतात यावे लागणार आहे. ते यासाठी तयार असतील आणि २ आठवडे क्वारंटाईन (Quarantine) राहतील का? यानंतरही ते आयपीएलमध्ये खेळू शकतील की नाही, हे सांगणे कठीण आहे.”
“सध्यातरी आम्ही आयपीएलबद्दल कोणताही विचार केलेला नाही. जे काही बातम्या येत आहेत, त्या माध्यमांनी ठरवलेल्या आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.
बीसीसीआयने (BCCI) आयपीएलचा १३ वा मोसम सध्यातरी कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा भारतावर आरोप, मॅच फिक्सिंगचा गड आहे भारत
-…तर होऊ शकते आयपीएल २०२० चे आयोजन
-विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरलेल्या या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने केली खांद्याची सर्जरी





