21 नोव्हेंबरपासून भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होणार आहे. 18 जानेवारीत संपणाऱ्या या दौऱ्यात भारत तीन टी-20, चार कसोटी आणि तीन वन-डे सामने खेळणार आहे.
या दौऱ्यात भारतीय संघाच्या जेवणातील मेनुमधून बीफ हा पदार्थ काढण्यात यावा असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले आहे.
अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, दोन आठवड्यापूर्वी बीसीसीआयच्या दोन सदस्यांनी ऑस्ट्रेलियाला या दौऱ्याबाबत भेट दिली होती. याच सदस्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाच्या जेवणाच्या मेनूमधून बीफ काढण्यास सांगितले.
इंग्लंड दौऱ्यावेळी भारतीय संघाच्या जेवणात बीफ हा पदार्थ होता असे बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट केले. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. म्हणून या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे.
तसेच जे दोन अधिकारी ऑस्ट्रेलियात गेले होते त्यांनी भारतीय संघाच्या जेवणात शाकाहारी मेन्यू असावा हे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय कर्णधार विराट कोहलीने 2019च्या विश्वचषकासाठी बीसीसीआय समोर काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये प्रवासासाठी एक आरक्षित रेल्वेचा कोच, खेळाडूंना आवश्यक असलेली फळे आणि यात विश्वचषकादरम्यान केळी उपलब्ध असाव्यात, तसेच ट्रेन प्रवासावेळी आरक्षित कोच असावा आणि या संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंना त्यांच्या पत्नीची किंवा प्रेयसीची सोबत असावी अशा मागण्या केल्या आहेत.
A well earned Lunch for #TeamIndia.
You prefer? #ENGvIND pic.twitter.com/QFqcJyjB5J
— BCCI (@BCCI) August 11, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही, दिग्गज खेळाडू कडाडला
–बापरे! १९ वर्षीय गोलंदाजाने घेतल्या एकाच डावात १० विकेट
–प्रथमच टीम इंडिया धोनीला मिस करणार, जाणुन घ्या कारण