भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली. ज्यामध्ये एकूण सात खेळाडूंना केंद्रीय करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर या यादीत श्रेयस अय्यर, इशान किशनपासून ते युझवेंद्र चहल आणि चेतेश्वर पुजारापर्यंतच्या नावांचा समावेश आहे. तसेच पांड्या विश्वचषकादरम्यान जखमी झाला होता आणि गेल्या आठवड्यापर्यंत तो क्रिकेटपासून दूर होता.
त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली, ज्यामध्ये हार्दिकचे नाव अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. बीसीसीआयने केंद्रीय करारातून इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांसारखी नावे बाजूला केली आहेत. पण हार्दिकला ए ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे, अनेकांच्या मनात प्रश्न आहे की पंड्या या यादीत आपले स्थान कसा टिकवू शकला आहे.
याबरोबरच बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे की, “आम्ही पांड्याशी चर्चा केली आहे, तो जेव्हा उपलब्ध असेल तेव्हा देशांतर्गत व्हाईट-बॉल स्पर्धा खेळण्यास सांगण्यात आले आहे.” तसेच बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाच्या मूल्यांकनानुसार तो लाल चेंडूच्या स्पर्धेत गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे पंड्यासाठी रणजी करंडक खेळणे हे समीकरण सध्या बाजूला झाले आहे. पण हार्दिकला पांढऱ्या चेंडूच्या स्पर्धा खेळाव्या लागतील नाहीतर त्याने तसे न केल्यास तो कराराला मुकणार आहे.
तसेच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही इशान किशन आणि श्रेयस अय्यरच्या समर्थनार्थ बोलताना दिसले आहेत. तर इरफान पठाणने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला आहे की, ‘श्रेयस आणि इशान दोघेही प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. आशा आहे की जोरदार पुनरागमन करतील. जर हार्दिक पांड्या सारख्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेट अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही.
दरम्यान, हार्दिक पांड्याने पदार्पण केल्यापासून भारताने 160+ टी-20 सामने खेळले असून हार्दिक पांड्या फक्त 92 टी-20 सामने खेळला आहे. तसेच हार्दिक पांड्या दुखापती आणि इतर कारणांमुळे तो 43% सामने खेळू शकला नाही. तर हार्दिक पांड्याने पदार्पण केल्यापासून 156 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने फक्त 86 सामने खेळला आहे. तर तो दुखापती आणि इतर कारणांमुळे तो 45% सामने खेळू शकला नाही. त्याबरोबरच हार्दिक पांड्याने पदार्पणापासूनच भारतीय संघासाठी फक्त 17% कसोटी सामने खेळला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- विराट कोहली आणि स्मृती मानधना यांच्यातील कनेक्शन पाहून तुम्हाला बसेल धक्का; घ्या जाणून काय आहे प्रकरण
- भारतीय क्रिकेटपट्टूकडून मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप, म्हणाला, विकेट असे पडत होते की…