इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढच्या सत्रात मैदानातील पंचांना गोलंदाजांनी टाकलेला नो बाॅल पकडण्यासाठी तांत्रिक सहकार्य मिळावे यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जोरदार प्रयत्न करत आहे.
कोलकाता येथे भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात नो बॉलसाठी तांत्रिक सहकार्य घेण्याचा हा प्रयत्न लागू करण्यात आला होता. परंतु आता बीसीसीआय ही पद्धत अशीच पुढे वापरण्याच्या विचारात आहे.
नो बॉल पकडण्यासाठी बीसीसीआय रनआऊट कॅमेरा देखील वापरत आहे. जेणेकरून पंच गोलंदाजाची कमतरता पकडू शकतील.
आयपीएलच्या मागील मोसमात गोलंदाजांकडून टाकण्यात आलेले अनेक नो बॉल पकडण्यास पंचाना अपयश आले होते. त्यामुळे बरीच चर्चा झाली होती. तसेच ब्रिस्बेनमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही नो बॉलवरुनच गोंधळ झाला होता. या सामन्यात दुसर्या दिवसाच्या दोन सत्रात 21 नो बाॅल पकडता आले नव्हते.
बीसीसीआयचे सहसचिव जयेश जॉर्ज (Jayesh George) यांनी आयएएनएसला सांगितले की, नवीन पद्धती लागू करण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नाही.
‘हो, हे काम अजूनही सुरू आहे. आयपीएल नेहमीच प्रयोग करण्यासाठी तयार असते. आमचा प्रयत्न आहे की आयपीएलचा प्रत्येक हंगाम नवीन तंत्रज्ञान घेऊन येईल आणि खेळ पुढे नेण्यात मदत करेल,” असे जाॅर्ज म्हणाले.
“महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानामुळे असे प्रश्न सोडविण्यात मदत होऊ शकते, खेळाडूंनी हा त्रास का सहन करायचा?” असेही जाॅर्ज म्हणाले.
‘भूतकाळात आपण पाहिले आहे की नो बाॅल हा वादाचा मुद्दा राहिला आहे. मला असा विश्वास आहे की कोणताही नो बॉल पकडण्यासाठी हे तंत्र वापरले जाऊ शकते. यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासणीची आवश्यकता आहे आणि आम्ही हे विंडीज मालिकेतही ही पद्धत सुरू ठेवू,” असे जाॅर्ज म्हणाले.
तिसरे पंच धावबाद तपासण्यासाठी वापरलेले कॅमेरे नो बॉल तपासण्यासाठी वापरतील. हे कॅमेरे एका सेकंदात 300 फ्रेम कॅप्चर करतात. ऑपरेटर त्याच्या इच्छेनुसार हे कॅमेरे झूम करू शकतो.
या महिन्याच्या सुरूवातीला आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तेव्हा काऊंसिलच्या सदस्याने सांगितले की,
“जर पुढील आयपीएलमध्ये सर्व काही ठीक झाले तर नियमित पंचांशिवाय नो बॉलची तपासण्यासाठी एक वेगळा पंच आपण पाहू शकतो. ही कल्पना जरा विचित्र वाटेल, पण आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता,” असे काऊंसिलच्या सदस्याने सांगितले.
हॅट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये ५ विकेट्स घेत अभिमन्यू मिथूनने रचला इतिहास
वाचा👉https://t.co/4YtqABX4e8👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #abhimanyumithun— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019
राहुल द्रविडने आयपीएलमधील संघांना दिला हा महत्त्वाचा सल्ला; म्हणाला…
वाचा👉https://t.co/d5vTgtKIHw👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #IPL #RahulDravid— Maha Sports (@Maha_Sports) November 29, 2019