भारतीय नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, ज्याची एकूण संपत्ती 18 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे कमावण्याचे अनेक स्त्रोत आहेत. आयपीएमध्ये मीडिया हक्क आणि टायटल स्पॉन्सरशिप हे कमावण्याचे काही मुख्य स्त्रोत आहेत.
इथे, विशेषत: टायटल स्पॉन्सरशिपबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाच्या (Team India) जर्सीवर मोठ्या अक्षरात लिहिलेले ‘DREAM 11’ गेल्या 1 वर्षापासून आपण पाहत आहोत. पण जर्सीच्या पुढच्या बाजूला नाव लिहिण्यासाठी कंपनी बीसीसीआयला किती रूपये देत असेल?
ड्रीम 11 हा एक स्पोर्ट्स ब्रँड आहे, ज्याची एकूण संपत्ती कोटींमध्ये आहे. त्याने भारतीय संघाचे मुख्य स्पाॅन्सरशिप हक्क 358 कोटी रुपयांना विकत घेतले होते. बीसीसीआयसोबत (BCCI) 358 कोटी रूपयांचा हा करार (जुलै 2023 ते मार्च 2026) पर्यंत चालणार आहे. बीसीसीआयने द्विपक्षीय मालिकेतील टायटल स्पॉन्सरशिपसाठी आधारभूत किंमत 3 कोटी रूपये प्रति सामना ठेवली होती.
याआधी भारतीय संघाच्या जर्सीवर एज्युकेशन ब्रँड (Byju’s) लिहिलेला होता, जो प्रत्येक सामन्यासाठी 5.5 कोटी रुपये देत होता. आता भारताच्या पुरुष, महिला आणि अंडर19 स्तरावरील संघांच्या जर्सीवर मोठ्या इंग्रजी अक्षरात ‘DREAM11’ लिहिलेले आहे.
भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आणि भारतातील क्रिकेटची लोकप्रियता लक्षात घेता प्रत्येक वेळी मीडियाचे हक्कही हजारो कोटींना विकले गेले आहेत. भारतीय संघाचे सध्याचे मीडिया अधिकार वायकॉम नेटवर्ककडे आहेत, ज्याने (सप्टेंबर 2023 ते मार्च 2028) या कालावधीत भारताचे सामने प्रसारित करण्यासाठी 5,963 कोटी रुपये दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
थेट अंपायरलाच दिल्या शिव्या, आयसीसीने केली मोठी कारवाई!
वनडे क्रमवारीत आफ्रिकन खेळाडूचा जलवा, तर भारतीय खेळाडूंना बसला फटका
SFA चॅम्पियनशिप 2024 मुंबई: निर्वाण कैस्थ, आरुष गोरे, साची नागोटकर यांना सुवर्णपदक






