देशांतर्गत क्रिकेटमधील (domestic cricket) महिला सीनियर एकदिवसीय स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी यांसारख्या स्पर्धा अलिकडच्या काळात पार पडल्या आहेत. पुढच्या काही दिवसांमध्ये २०२२ रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कोरोना विषाणूच्या कारणास्तव मागच्या वर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली होती. अशात खेळाडूंना नुकसान होऊ नये यासाठी बीसीसीआयने त्यांना भरपाईच्या देण्याचा शब्द दिला होता. आता पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना मागच्या हंगामाच्या भरपाईची रक्कम मिळाली आहे.
बीसीसीआयने मागच्या वर्षी घोषित केले होते की, कोरोनाच्या कारणास्तव स्पर्धा जरी रद्द करावी लागली असली तरी, बोर्ड खेळाडूंना याची भरपाई देईल. यासाठी भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीने एक योजना तयार केली होती, ज्याच्या मदतीने खेळाडूंना भरपाई देता येईल. आता बीसीसीआयने या समितीच्या मार्गदर्शनानेच खेळाडूंना भरपाई दिली आहे.
मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, यावेळी खेळाडूंनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. यावर्षीची रणजी ट्रॉफी स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआयने रणजी ट्रॉफीचा पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मागच्या हंगामाची भरपाई खेळाडूंना दिली आहे. माहितीनुसार, खेळाडूंना २०१९-२० हंगामात जेवढे वेतन मिळत होते, त्याच्या ५० टक्के रक्कम त्यांना भरपाईच्या रूपात दिली गेली आहे.
बीसीसीआयने नुकतीच देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंच्या वेतनात वाढ आणि बदल केला आहे. मात्र, मागच्या हंगामासाठी खेळाडूंना मिळालेल्या भरपाईशी याचा काहीच संबंध नाही. रणजी ट्रॉफीमध्ये मागच्या हंगामापर्यंत प्रत्येक खेळाडूला सामन्यांप्रमाणे मोबदला मिळत होता. प्रत्येक सामन्यासाठी एका खेळाडूला ३५ हजार रूपये मिळत होते. जर एखाद्या खेळाडूने २०१९-२० हंगामात ८ सामने खेळले असतील, तर त्याला ११.२० लाख रूपये मोबदला मिळाला असेल. याच आकड्यांच्या आधारे मागच्या हंगामाची भरपाई खेळाडूंना दिली गेली आहे. ज्या खेळाडूने २०१९-२० हंघामात ११.२० लाख रूपये घेतले होते, त्याला मागच्या हंगामासाठी ५.१० लाख रूपये भरपाई दिली गेली आहे.
महत्वाच्या बातम्या –
वनडे मालिकेत भारताला टक्कर देण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा; डी कॉकचे पुनरागमन, तर…
पुणेरी ‘पस्त’ पलटण! आघाडी गमावत बेंगलोरविरुद्ध स्वीकारला पराभव
वॉर्नने क्रिकेटविश्व गाजवल खरं, मात्र पहिल्या सामन्यात शास्त्रींनी केलेली धुलाई तो विसरला नाही
व्हिडिओ पाहा –