येत्या एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ चा रोमांच सुरू होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव देखील करण्यात येणार आहे. अशातच बीसीसीआयने दिलेल्या निर्देशामुळे फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. याचा फटका चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांसारख्या संघांना बसू शकतो.
एप्रिल महिन्यात, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघ ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका, तसेच ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. तर दुसरीकडे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात देखील मर्यादित षटकांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यामुळेच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड संघातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी जाऊ देण्याचे निर्देश आयपीएल फ्रांचायझींना दिले आहेत.
दक्षिण आफ्रिका संघाचे खेळाडू हे पहिल्या २ आठवड्यांसाठी उपलब्ध नसतील तर न्यूझीलंड संघातील खेळाडू हे एप्रिल महिन्यातील शेवटच्या २ आठवड्यांसाठी उपलब्ध नसणार आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिली परवानगी
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रवक्ता रिचर्ज ब्रूक यांनी म्हटले आहे की, न्यूझीलंड क्रिकेटपटूंना पूर्ण आयपीएल स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली जाईल. तसेच त्यांना एनओसी (ना हरकत पत्र) दिले जाईल. न्यूझीलंडचे सर्व क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध असणार आहेत.
दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. परंतु दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. इनसाईड स्पोर्ट्समध्ये छापलेल्या एका वृत्तानुसार, एका फ्रेंचाईजी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, जर दक्षिण आफ्रिका – पाकिस्तान संघांतील मालिका १६ एप्रिल रोजी संपत असेल तर, दक्षिण आफ्रिकन खेळाडू पहिल्या २ आठवड्यांसाठी उपलब्ध नसतील त्यांनतर त्यांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.
आयपीएल २०२१ मध्ये सहभादी असलेले दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सक्रिय खेळाडू –
फाफ डु प्लेसिस (चेन्नई) लुंगी एनगिडी( दिल्ली), कगिसो रबाडा (दिल्ली) एन्रीच नॉर्किए (दिल्ली), क्विंटन डी कॉक (मुंबई), डेविड मिलर (राजस्थान)
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंत १०० कसोटी सामने खेळू शकतो, ‘या’ दिग्गजाची भविष्यवाणी
केवळ ३७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या ‘या’ फलंदाजांवर लागू शकते करोडोंची बोली
आयएसएल २०२०-२१ : ओदीशावरील विजयासह एफसी गोवा संघाची बाद फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच