बीसीसीआय सर्वोच्च परिषदेने गुरुवारी २०२२-२३ हंगामासाठी विविध पर्यायांवर चर्चा केली, बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घोषित केले की २०२२-२३ मध्ये संपूर्ण देशांतर्गत हंगाम खेळला जाईल. ८ सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफीने पुरुषांच्या वरिष्ठ हंगामाची सुरुवात करण्याचा मंडळाचा विचार आहे. यासोबतच बीसीसीआय १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान इराणी चषक आयोजित करण्याचा विचार करत आहे.
यापूर्वी दुलीप ट्रॉफी पाच विभागांमध्ये बाद पद्धतीने आयोजित करण्यात आली होती परंतु नंतर तो तीन संघांचा सामना बनला, ज्यामध्ये अव्वल दोन संघ राऊंड-रॉबिन स्वरूपाच्या आधारे अंतिम फेरीत पोहोचले. इराणी चषक स्पर्धेत सध्याच्या रणजी चॅम्पियनचा सामना उर्वरित भारतीय संघाशी आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी आयोजित करण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली. मुश्ताक अली ट्रॉफी (टी२०) ११ ऑक्टोबरपासून खेळली जाण्याची शक्यता आहे तर विजय हजारे ट्रॉफी (वनडे) १२ नोव्हेंबरपासून अपेक्षित आहे. रणजी ट्रॉफी १३ डिसेंबरपासून सुरू होऊ शकते, १ फेब्रुवारीपासून बाद फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत.
बैठकीत चर्चा झालेल्या एका स्वरूपानुसार, रणजी ट्रॉफीमध्ये आठ एलिट संघांचे चार गट आणि सहा प्लेट संघांचा एक गट असू शकतो. गांगुली म्हणाले की, येत्या हंगामापासून महिलांच्या १६ वर्षांखालील गटाला सुरुवात होणार आहे.
असे असू शकते देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक
इराणी करंडक – १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर
सय्यद मुश्ताक अली करंडक – ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर
विजय हजारे करंडक – १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
रणजी करंडक – १३ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तर ठरलं! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘या’ दोन महत्त्वाच्या स्पर्धांची वापसी; या तारखांना होणार सुरुवात
कॅरेबियन भूमीवर कॅप्टन शिखरकडे धोनी-रोहितला मागे टाकण्याची संधी; हे विक्रम करेल स्वतःच्या नावे
ब्रेकिंग! आणखी एका दिग्गजाची टी२० मधून निवृत्ती! आयसीसी पुरस्कारावर कोरलेय नाव