भारतीय संघ आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) दौऱ्यावर असतानाच बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2024-25 साठी टीम इंडियाच्या (वरिष्ठ पुरुष) आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामासाठी वेळापत्रक जाहीर केले.
सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या आयडीएफसी फर्स्ट बँक कसोटी मालिकेसह आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामाची सुरुवात होईल, त्यानंतर तीन सामन्यांची टी20 मालिका होईल. चेन्नईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणारी पहिली कसोटी तर कानपूरमध्ये 27 सप्टेंबरपासून दुसरी कसोटी होणार आहे. धर्मशाला, दिल्ली आणि हैदराबाद येथे तीन टी-20 सामने खेळवले जातील.
यानंतर 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरु येथे न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पुणे आणि मुंबई अनुक्रमे दुसरी आणि तिसरी कसोटी खेळणार आहेत.
नवीन वर्षाच्या आगमनात इंग्लंडचा भारत दौरा पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी पांढऱ्या चेंडूचा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
बांग्लादेशचा भारत दौरा
पहिली कसोटी – 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई.
दुसरी कसोटी – 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर.
पहिला टी20 सामना- 6 ऑक्टोबर, धर्मशाला.
दुसरा टी20 सामना- 9 ऑक्टोबर, दिल्ली.
तिसरा टी20 सामना- 12 ऑक्टोबर, हैदराबाद.
न्यूझीलंडचा भारत दौरा
पहिली कसोटी – 16 ते 20 ऑक्टोबर, बेंगळुरू.
दुसरी कसोटी – 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे.
तिसरी कसोटी – 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई.
इंग्लंडचा भारत दौरा (2025)
22 जानेवारी – पहिला टी20, चेन्नई
25 जानेवारी – दुसरी टी20, कोलकाता
28 जानेवारी – तिसरा टी20, राजकोट
31 जानेवारी – चौथी टी20, पुणे
2 फेब्रुवारी – पाचवी टी20, मुंबई
6 फेब्रुवारी – पहिला एकदिवसीय सामना, नागपूर
9 फेब्रुवारी – दुसरा एकदिवसीय सामना, कटक
12 फेब्रुवारी – तिसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी ‘हा’ खेळाडू एक्स फॅक्टर! टी20 विश्वचषकादरम्यान फलंदाजी पाहून रवी शास्त्रीं प्रभावित
IND vs AFG; सुपर 8 सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूचा रोहित-विराटला इशारा
क्रिकेट जगतासाठी धक्कादायक बातमी; टीम इंडियाच्या या खेळाडूने केली आत्महत्या