---Advertisement---

बीसीसीआयचा मोठा निर्णय! तुषार-मयंकसह हे 7 वेगवान गोलंदाज झाले मालामाल

On: गुरूवार, जून 27, 2024 4:02 PM
---Advertisement---

भारतीय संघ शुबमन गीलच्या नेतृत्वाखाली जुलै महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने अनेक नवीन खेळाडूंना संघात समावेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेलाही आयपीएलमध्ये संघात स्थान मिळाले आहे. संघात स्थान मिळण्यासोबतच तुषारचा बीसीसीआयने आपल्या करारात समावेश केला आहे. एका अहवालानुसार, तुषारसह सात गोलंदाजांना वेगवान गोलंदाजीचा करार देण्यात आला आहे. या यादीत लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवचाही समावेश आहे.

तुषार देशपांडेने देशांतर्गत सामन्यांबरोबरच आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. तो मुंबईकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळतो. तुषार भारत ‘अ’ संघाकडूनही खेळला आहे. त्याने इंग्लंड ‘अ’ संघाविरुद्ध 15 विकेट घेतल्या. यासोबतच त्याचा मुंबईकडून खेळतानाचा रणजी हंगामही उत्कृष्ट होता. तुषारची दमदार कामगिरी पाहून त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. यासोबतच वेगवान गोलंदाजीचा करारही देण्यात आला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, तुषारसोबत मयंक यादवलाही वेगवान गोलंदाजीचा करार मिळाला आहे. आकाश दीप, विजय कुमार वैशाक, उमरान मलिक, यश दयाल, विद्वथ कवेरप्पा यांचाही या यादीत समावेश आहे. मयंकच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 17 लिस्ट ए सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत. यासह त्याने 14 टी-20 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. मयंकने एक प्रथम श्रेणी सामना खेळला आहे.

भारताचा झिम्बाब्वे दाैरा

पहिला टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 6 जुलै : हरारे
दुसरा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 7 जुलै : हरारे
तिसरा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 10 जुलै : हरारे
चाैथा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 13 जुलै : हरारे

झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी भारताचा संघ-

शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद , मुकेश कुमार, तुषार देशपांडे

महत्तवाच्या बातम्या-

विराट-रोहितबद्दल कपिल देवनं केलेल्या वक्तव्यानं उडाली खळबळ!
‘या’ दोन रेकाॅर्डसहित दक्षिण आफ्रिकेनं मारली फायनलमध्ये धडक!
भारत-इंग्लंड सामन्यात पावसाचं सावट! मॅचपूर्वी पाहा उपांत्य फेरीचे संपूर्ण गणित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---