बीसीसीआय लवकरच आगामी हंगामासाठी (2022-23) राष्ट्रीय संघाच्या करारांची यादी जाहीर करू शकते. यावर्षीच्या यादीत काही अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंना करारमुक्त केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने अजिंक्य रहाणे, इशान शर्मा आणि रिद्धिमान साहा यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. तसेच सूर्यकुमार यादव, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांना संघाच्या करारात बढती मिळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआय प्रत्येक वर्षी त्यांच्या राष्ट्रीय संघासोबत करारबद्ध झालेल्या खेलाडूंची यादी घोषित करत असते. या यादीत चार वेगवेगळ्या वातळीवर खेलाडूंना सामील केले जात असते. खेळाडू ज्या ग्रेडमध्ये सहभागी असेल, त्यावर त्यांचे वेतन ठरत असते. यावर्षी राष्ट्रीय संघाच्या कारारांचा निर्णय 21 डिसेंबर रोजी एपेक्स काउंसिलच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला वर्षाच्या सुरुवातीलाच याविषयी संकेत दिले गेले होते की, भविष्यात त्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळेल, याची शक्यात खूप कमी आहे. तसेच दुसराकड अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि ईशान शर्मा (Ishant Sharma) मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहेत. रहाणेने त्याचा शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. तसेच ईशान शर्माने नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याचा शेवटचा कसोटी सामना खेलला होता. तेव्हापाहून हे दोन्ही संघ संघातून बाहेर आहेत आणि भविष्यात देखील त्यांना संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार राहिला आसला, तरी सध्या संघात त्याच्यासाठी कुठेच जागा दिसत नाहीये.
हार्दिक पंड्याची बढती होण्याची शक्यता –
बीसीसीआयच्या नव्या राष्ट्रीय करारांमध्ये हार्दिक पंड्या () याला फायदा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. हार्दिकला भारताच्या टी-20 संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. मागच्या वर्षी दुखापतीमुळे त्याचा फॉर्म खराब होता, पण आगामी हंगामात त्याच्याकडून संघाला चांगल्याच अपेक्षा आहेत. असात करारबद्ध करताना देकील बीसीसीआय त्याला बढती देऊ शकते. हार्दिक आगामी हंगामासाठी ग्रेड-बी मध्ये सहभागी होऊ शकतो.
सूर्यकुमार यादवलाही मिळणार फायदा –
सूर्यकुमार चालू हंगामात ग्रेड-सी मध्ये सहभागी आहे. मात्र, यावर्षी त्याचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रेड-सी मधून ग्रेड-बी किंवा ग्रेड-ए मध्ये त्याचा समावेश होऊ शकतो. यावर्षी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात सूर्यकुमानरे वादळी खेळी केली आणि संघाला उपांत्य सामन्यापर्यंत नेण्यासाठी महत्वाची भूमिका देखील पार पाडली.
ईशान किशनलाही मिळू शकतो राष्ट्रीय संघाचा करार –
शुबमन गिल मागच्या वर्षी भारताच्या कसोटी संघाचा नियमित खेलाडू राहिला आहे. त्याला आगामी हंगामात ग्रेड सी मधून ग्रेड बी मध्ये संधी दिली जाऊ शकते. तसेच बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात द्विशतक ठोकणाऱ्या इशान किशन यालाही राष्ट्रीय संघाचा करार मिळू शकतो.
राष्ट्रीय संघासोबत करारबद्ध होणाऱ्या खेळाडूंच्या अशा असतात चार ग्रेड
भारतीय संघासोबत करारबद्ध होणाऱ्या खेलाडूंना चार वेगेवेगळ्या ग्रेडमध्ये विभागले जाते. यामध्ये ग्रेड ए+, ग्रे ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी असे चार प्रकार आहेत. ग्रेड ए+ मधील खेलाडूंना संघाकडून सर्वाधिक 7 कोटी रुपयांचा करार मिळतो. ग्रेड ए मधील खेळाडूंना 5 कोटी रुपये मिळतात, तर ग्रेड बी आणि सी मधील खेळाडूंना अनुक्रमे तीन आणि एक कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले जाते. सध्या रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या तिघांनाच संघाकडून ए+ ग्रेडमध्ये ठेवले गेले आहेत. आगामी हंगामात देखील याच खेलाडूंना सर्वोत्तम ग्रेडमध्ये कायम ठेवले जाऊ शकते.
2021 – 2022 हंगामासाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय करारात सहभागी असलेले खेळाडू
ग्रेड ए+: विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
ग्रेड ए: रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी, रिषभ पंत.
ग्रेड बी: चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज.
ग्रेड सी: शिखर धवन, हार्दिक पांड्या, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, रिद्धिमान साहा.
(BCCI is likely to release these three players along with Ajinkya Rahane)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशान किशनमुळे ‘या’ भारतीय फलंदाजाचे नुकसान, वसीम जाफरने व्यक्त केले मत
धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्याने वापरली ‘ही’ अनोखी पद्धत, सुंदर व्हिडिओ होतोय व्हायरल






