भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा खेळवली जात आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आॉफ्रिकेविरुद्ध जूनमध्ये ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) काही नियम बदलण्याची शक्यता आहे.
सध्या आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) साखळी फेरीचे सामने देखील पुणे आणि मुंबई या शहरांत बायो बबलमध्ये (Bio-Bubble) खेळवले जात आहे. पण ९ ते १९ जून दरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील टी२० मालिकेसाठी (T20 Series) बायोबबल नसण्याची शक्यता आहे. तसेच क्वारंटाईनपण खूप कठोर नसण्याची शक्यता आहे. ही मालिका ५ शहरांत खेळवली जाणार आहे, यात दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे.
गेली २ वर्षे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील अनेक क्रीडास्पर्धा या बायो बबलमध्ये खेळवण्यात येत आहेत. पण, गेल्या काही महिन्यांत याच बायो-बबलमुळे खेळाडूंच्या तक्रारी वाढल्याचे जाणवत आहेत. बायो-बबलमुळे मानसिकत आरोग्य बिघडत असल्याच्याही तक्रारी झाल्या. त्यामुळे आता भारतातील कोरानाची सुधारत चाललेली स्थिती आणि लसीकरण पाहाता बीसीसीआय (BCCI) आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेसाठी बायो-बबल हटवण्याची शक्यता आहे.
‘जर सर्वकाही ठीक झाले आणि आत्ता आहे, तसेच सर्व नियंत्रणात राहिले, तर आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी२० मालिकेसाठी बायोबबल नसेल आणि कठोर क्वारंटाईनही नसेल. त्यानंतर आपल्याला (भारतीय संघाला) आयर्लंड आणि इंग्लंडला जायचे आहे. त्या देशातही कोणतेही बायोबबल असणार नाही,’ असे एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला माहिती दिली.
सध्या युनायटेड किंगडम (युके) येथे कोणत्याच क्रीडा स्पर्धेसाठी बायो-बबल नाही. त्याचमुळे भारतीय संघालाही अपेक्षा आहे की, ते जेव्हा आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहेत, त्यावेळी स्वतंत्र वातावरण असेल. याबरोबर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितले की, काही खेळाडूंना विश्रांती मिळण्याचीही शक्यता आहे.
अधिकारी म्हणाले, ‘काही खेळाडूंना काही काळाची विश्रांतीही मिळेल. जर तुम्ही सविस्तर चित्र पाहिले तर कळून येईल की एका पाठोपाठ एक मालिकांसाठी बायो-बबलमध्ये राहणे आणि आता २ महिन्यांसाठी आयपीएलसाठीही बायो-बबलमध्ये राहणे खेळाडूंसाठी थकवणारे आहे.’
पुढे ते म्हणाले, ‘पाच शहरात ९ ते १९ जून दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने होणार आहेत. नक्कीच सर्व खेळाडू सर्व सामने खेळणार नाहीत. काहींना पूर्ण विश्रांती दिली जाऊ शकते आणि काहींना काही सामन्यांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. जर या खेळाडूंना नियमित विश्रांती दिली नाही, तर त्यांनाच त्रास होईल. पण नक्कीच त्यांच्या विश्रांतीचा कालावधी निवडकर्ते प्रमुख प्रशिक्षकांशी चर्चा करून ठरवतील.’
दरम्यान, जून-जुलैमध्ये कराव्या लागणाऱ्या युके दौऱ्याचा (India Tour of UK) विचार करता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी२० मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, जयप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा अशा काही वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघातून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
शिखर धवनचा स्कूप शॉट बघून भले-भले पडले गार, कर्णधार जडेजाही झाला हैराण
‘धोनी थाला, कोहली किंग आहे आणि शिखर?’, भारतीय दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
‘कॅप्टन कूल’ धोनीच्या पत्नीचा चढला पारा! ट्वीट करत झाप झाप झापलं, जाणून घ्या प्रकरण