जगभरात सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जवळजवळ सर्व क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. भारतात होणारी क्रिकेटची सर्वात मोठी लीग आयपीएलदेखील १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यातच कोरोनाचा धोका भारतातही वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता ही परिस्थिती पाहता आयपीएल एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे.
काही रिपोर्ट्सच्यानुसार आयपीएलचा यावर्षीचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. पण टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय जर परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आली नाही तर संपूर्ण आयपीएलचा १३ वा मोसम जूलै-सप्टेंबरमध्ये घेण्याचा विचार करत आहे. कारण या कालावधीत अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने कमी आहेत.
या कालावधीत आशिया चषक होणार आहे. तसेच इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये मालिका होणार आहेत. त्याचबरोबर भारताचा विचार केला तर भारताला सप्टेंबरमध्ये आशिया चषक खेळायचा आहे. तसेच श्रीलंका विरुद्ध भारताचे जून आणि जूलैमध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिका होणार आहेत. त्यामुळे आता या मालिकांचा विचार करुन बीसीसीआय आयपीएलचा मोसम जूलै-सप्टेंबरमध्ये आयोजित करणार का हे पहावे लागेल.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की ‘२००९ ला आयपीएल दक्षिण आफ्रिकेमध्ये ३७ दिवसांमध्ये झाले होते. हा मोसम ५ आठवडे आणि २ दिवस चालला होता. त्याचप्रकारचा जर कालावधी उपलब्ध झाला तर यावेळीही आयपीएल आर्धे भारतात आणि आर्धे परदेशात होऊ शकते. किंवा संपूर्ण स्पर्धा दुसरीकडे हलवली जाऊ शकते. याचा निर्णय जगात कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहून घेतला जाईल.’
ट्रेडिंग घडामोडी-
–दुबईहुन परतलेल्या रायगडच्या ११ क्रिकेटपटूंनी कोरोना टेस्टनंतर ठोकली धूम
–बरोबर ८ वर्षापुर्वी याच दिवशी सचिनने घेतला होता मोठा निर्णय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–योग्य ठिकाणी गाडी पार्क न केल्यामुळे धोनीची पत्नी नाराज; पहा व्हिडिओ
–रणवीर सिंग नकोच; फक्त आणि फक्त हाच अभिनेता करु शकतो माझी भूमिका