येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संधी न दिल्यामुळे चोहोबाजूंनी भारतीय संघ निवडकर्त्यांवर टीका होताना दिसत आहे. निवडकर्त्यांनी रोहितच्या हॅमस्ट्रिंग (मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू) दुखापतीचा संदर्भ देत कोणत्याही संघात स्थान दिलेले नाही. परंतु आता बीसीसीआयची मेडिकल टीम रविवारी (१ नोव्हेंबर) रोहितच्या फिटनेसचे मूल्यांकन करणार आहे.
माध्यमातील वृत्तांनुसार, बीसीसीआयची मेडिकल टीम रोहितच्या दुखापतीची तपासणी करणार आहे. यावरुन तो तंदुरुस्त झाला आहे का अजूनही त्याला विश्रांतीची गरज आहे, याचा योग्य निर्णय घेतला जाईल.
याविषयी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “रविवारी रोहितच्या दुखापतीची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे योग्य असेल का नाही?, हे ठरवले जाईल. हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा प्रश्न आहे. यामुळे वेगाने धावा काढण्यात त्याला समस्या येऊ शकतात. त्यामुळे मेडिकल टीम तपासणीवरुन ठरवेल की, तो पूर्णपणे बरा झाला का अजून त्याला वेळ लागेल?.”
तसेच, पुढे रोहितच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीविषयी अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “जेव्हा कोणत्याही खेळाडूला हॅमस्ट्रिंगला दुखापत होते आणि ती दुखापत ग्रेड २ची नसते, तेव्हा त्या खेळाडूला चालण्यात किंवा साधारण शॉट खेळण्यात कसलीही अडचण येत नाही. मात्र, त्याला वेगाने धावल्यास त्रास होतो. वेगाने धावा घेण्यासाठी मानवी शरीरातील हॅमस्ट्रिंगवरील स्नायूंचा वापर होतो. त्यामुळे जर हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, तर वेगाने मागे वळल्यास किंवा धावल्यास स्नायुंवर तणाव पडतो.”
रोहित सध्या आयपीएल २०२०मध्ये युएईत आपल्या मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. त्याला दुखापत झाल्यामुळे तो मागील ४ सामन्यांपासून खेळत नाही. असे असले तरी त्याचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना मुकणार? अखेर फिजिओने सादर केला मेडिकल रिपोर्ट
दुखापतग्रस्त असूनही रोहित स्टेडियममध्ये कसा? माजी क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न
रोहित शर्माची आयपीएलमधून माघार? मुंबई इंडियन्सने दिली महत्त्वाची माहिती…
ट्रेंडिंग लेख-
राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला