सध्या क्रिकेट चाहत्यांना कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आतुरता असेल, तर ती म्हणजे टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. प्रत्येक चाहता आपल्या आवडत्या संघाला अंतिम सामन्यात खेळताना पाहू इच्छित आहे. मात्र, चारपैकी दोन संघच अंतिम सामना खेळणार आहेत. टी20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. तसेच, दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाईल. या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल, त्यांच्यात अंतिम सामना खेळला जाईल. अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे पार पडेल. या सामन्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह हेदेखील मेलबर्नला जाणार असल्याचे वृत्त आहे.
बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांच्याव्यतिरिक्त सचिव जय शाह (Jay Shah) यांच्यासोबत बीसीसीआयचे अधिकारीही मेलबर्न येथे टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्याची मजा लुटण्यासाठी जातील. हे सर्वजण 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयसीसी निवडणुकांसाठी आयसीसीच्या वार्षिक बैठकीसाठी मेलबर्नमध्ये उपस्थित असतील. बैठकीनंतर बोर्डाचे सर्व अधिकारी अंतिम सामना पाहण्यासाठी जातील. अंतिम सामन्यादरम्यान बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील. पीसीबी अध्यक्ष रमीज राजा हेदेखील अंतिम सामना पाहण्यासाठी येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.
पीसीबीसोबत होऊ शकते बैठक
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि पीसीबीचे अधिकारीही आयसीसी बैठकीनंतर एकमेकांची भेट घेतील. आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानात न जाण्यावर बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊ शकते. नुकतेच आशिया चषकावरून भारत आणि पीसीबीमध्ये वाद झाला होता. असे म्हटले जात होते की, टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना (T20 World Cup 2022 Final Match) पाहण्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) हादेखील सामील होऊ शकतो. याव्यतिरिक्त तो आयसीसी क्रिकेट समितीच्या प्रमुखाच्या रूपातही मेलबर्नमध्ये असू शकतो.
टी20 विश्वचषकात भारतीय संघाची दमदार कामगिरी
भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. यातील एका सामन्यात भारताच्या वाट्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करण्याची वेळ आली होती. यासह त्यांनी सुपर 12च्या गुणतालिकेत दुसऱ्या गटात अव्वल स्थानही पटकावले होते. अशात भारतीय संघ उपांत्य सामन्यात 10 नोव्हेंबर रोजी ऍडलेड मैदानावर इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. (bcci president roger binny and jay shah will be attending the final of the t20 world cup2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उर्वशी प्रकरण पंतच्या आलंय चांगलच अंगलट! आता चाहते तोंडावर म्हणू लागले…
भारताचे टेंशन वाढले! सेमीफायनलसाठी इंग्लंडच्या ताफ्यात टी20मध्ये 139 षटकार ठोकणाऱ्याची एंट्री