---Advertisement---

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाने पाचव्या दिवशी 328 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 97 षटकांत 329 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 3 विकेट्सने जिंकला त्याबरोबर भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ही मालिका सुद्धा जिंकली. त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

सौरव गांगुलीने ट्विट करताना लिहले, “भारतीय संघाचा हा उल्लेखनीय विजय आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन ज्या प्रकारे विजय मिळवला. ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सदैव स्मरणात ठेवले जाईल. त्याचबरोबर बीसीसीआयने भारतीय संघासाठी 5 कोटी बोनस जाहीर केला आहे. या विजयाचे मूल्य आकड्यात मोजण्याच्या पलीकडे आहे. या दौऱ्यात असलेल्या प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली. ”

भारतीय संघाने ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर तब्बल 32 वर्षानी विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या 328 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सर्वाधिक जास्त धावा शुबमन गिलने केल्या. त्याने 146 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 2 षटकार यांची आतिषबाजी करताना दमदार 91 धावांची खेळी केली. त्याचबरोबर भारतीय संघाची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे आक्रमण आपल्या अंगावर झेलत 201 चेंडूचा सामना करताना 7 चौकार ठोकून महत्त्वपूर्ण 56 धावांची खेळी केली. त्याने भारतीय संघाची एक बाजू लावून धरली.

त्यांनंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने मोक्याच्या क्षणी फलंदाजीला येत, ऑस्ट्रेलिया गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना नाबाद 89 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 138 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 2 षटकार खेचत नाबाद 89 धावा केल्या. तसेच 96.6 षटकात विजयी चौकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघाचे ट्विटरवरुन अभिनंदन केले.

ऑस्ट्रेलिया संघाकडून दुसर्‍या डावात गोलंदाजी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 24 षटके गोलंदाजी करताना 55 धावा दिल्या. त्याचबरोबर 4 गडी बाद केले. त्याचबरोबर नॅथन लायनने सुद्धा प्रभावी गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या. त्यांनंतर जोश हेझलवूडने 1 विकेट्स घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ : कर्णधार रहाणेचा आक्रमक अंदाज, नॅथन लाॅयनला ठोकला खणखणीत षटकार

फक्त ब्रिस्बेन कसोटी पराभूतच केले नाही तर आयसीसी क्रमवारीतही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पछाडलं

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---