भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मातून जात आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावल्यानंतर धावांची शंभरी गाठू शकलेला नाही. याखेरीज तो अर्धशतकी खेळी करण्यासाठीही झगडताना दिसत आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२२ पूर्वी विराटचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली याने विराटला एकटे सोडण्याची मागणी केली आहे.
गांगुलीला (Sourav Ganguly) अपेक्षा आहे की, विराट (Virat Kohli) आशिया चषकाद्वारे (Asia Cup 2022) त्याच्या जुन्या फॉर्मात परतेल. परंतु तत्पूर्वी त्याला त्याला त्याच्या इच्छेनुसार सराव करू द्यावा, असेही गांगुलीचे (Sourav Ganguly On Virat Kohli) म्हणणे आहे.
इंडिया टुडेशी बोलताना गांगुली म्हणाला की, “त्याला सराव करुद्या. त्याला सामने खेळुदे. तो मोठा खेळाडू आहे आणि त्याने भरपूर धावाही केल्या आहेत. मला अपेक्षा आहे की, तो पुनरागमन करेल. तो गेल्या ३ वर्षांत शतक नाही करू शकला. परंतु मला विश्वास आहे की, तो आशिया चषकाद्वारे त्याचा फॉर्म परत मिळवेल.”
आशिया चषकात विराटचे प्रदर्शन कौतुक करण्याजोगे
दरम्यान आशिया चषकात विराटचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. त्याने २०१० ते २०१६ दरम्यान आशिया चषकात १६ सामने खेळले आहेत. १६ सामन्यातील १४ डावात फलंदाजी करताना त्याने ६३.८३ च्या सरासरीने ७६६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत. आशिया चषकात सर्वोच्च वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावांची खेळी केली होती.
अशात विराटकडून आशिया चषकात मोठ्या खेळींची अपेक्षा असेल. आशिया चषकातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. २८ ऑगस्टला दुबई येथे हा सामना होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ त्यांचा दुसरा साखळी फेरी सामना क्वालिफायर संघासोबत खेळेल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईला मोठा झटका! तेंडूलकरनंतर आता ‘हा’ महत्वाचा खेळाडूही सोडणार संघ
‘सूर्यकुमार यादव अन् एबी डिविलियर्समध्ये फारसा फरक नाही’, तीन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराचा दावा
राहुलचं टेन्शन वाढलंय! स्टार अष्टपैलू खेळडू थेट मालिकेतून होणार बाहेर