भारत विरुद्ध इंग्लंड Ind vs ENG यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना 19 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने, हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या Rohit Sharma Retirement निवृत्तीबाबतच्या चर्चांनी क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. काही वृत्तांमध्ये असा दावा केला गेला होता की, लॉर्ड्सवरील हा एकदिवसीय सामना रोहितच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो. त्यानंतर तो निवृत्तीची घोषणा करू शकतो.
बीसीसीआयचे BCCI सचिव देवजित सैकिया यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, लॉर्ड्सवरील तिसरा एकदिवसीय सामना हा रोहित शर्माचा Rohit Sharma शेवटचा सामना नाही आणि त्याच्या निवृत्तीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
वृत्तानुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर Ajit Agarkar आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर Gautam Gambhir यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले, त्याबद्दल बीसीसीआयचे काही वरिष्ठ अधिकारी नाराज होते.
या वृत्तात म्हटले आहे की, दिवसभर विविध संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी यावर अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
तसेच, या संवेदनशील विषयाची योग्य प्रकारे हाताळणी करण्यात सैकिया जे बीसीसीआयचे एक प्रभावशाली माजी अधिकारी आणि कायदेतज्ज्ञ आहेत. यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असेही या वृत्तात नमूद केले आहे.
असे वृत्त आहे की, एका महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अशा प्रकारची माहिती पसरवली जात असल्यामुळे रोहित शर्मा नाराज आहे. एका वरिष्ठ खेळाडूला दिल्या गेलेल्या वागणुकीबद्दल त्याने आपली नाराजी व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे.
मात्र, देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत रोहित शर्मा संघाच्या योजनांचा भाग आहे, तोपर्यंत तो भारतासाठी खेळत राहील.”
रोहित शर्मा सध्या 300 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या विशेष गटात सामील होण्यापासून केवळ 13 सामने दूर आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 287 एकदिवसीय सामने खेळले असून, 48.58 च्या सरासरीने 11757 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 33 शतकेही आहेत.
जर रोहित शर्मा 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळला, तर तो सहजपणे Rohit Sharma 300 ODI Matches 300 एकदिवसीय सामन्यांचा टप्पा गाठू शकेल. आतापर्यंत सात भारतीय खेळाडूंनी 300 किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी विराट कोहली हा या यादीतील एकमेव खेळाडू आहे. जर रोहितने हा टप्पा गाठला, तर 300 एकदिवसीय सामने खेळणारा तो आठवा भारतीय खेळाडू ठरेल.






