---Advertisement---

BREAKING: विश्वचषकातील पराभवाचे खापर फोडत बीसीसीआयने बरखास्त केली संपूर्ण निवडसमिती

On: शुक्रवार, नोव्हेंबर 18, 2022 9:17 PM
chetan sharma an selection committee
---Advertisement---

नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची सुरुवात आता झाली असून, बीसीसीआयने थेट आपली संपूर्ण निवड समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका  प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी20 विश्वचषकानंतर चेतन शर्मा यांच्या नेतृत्वातील निवड समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये आता मोठे बदल होणार हे नक्की झालेय.

यांनी निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा हे होते. तर, उत्तर विभागाचे प्रतिनिधी म्हणून हरविंदर सिंग, पूर्व विभागाचे प्रतिनिधी देवषिश मोहंती व दक्षिण विभागाचे प्रतिनिधी सुनील जोशी यांचा या निवड समितीत समावेश होता. पश्चिम विभागाचे प्रतिनिधी ऍबे कुरूविला यांचा कार्यकाळ या वर्षाच्या सुरुवातीला संपला होता. त्यानंतर ती जागा रिक्त होती.

मागील निवडसमिती बरखास्त केल्यानंतर आता बीसीसीआयने नव्या निवड समिती साठी अर्ज मागविले आहेत. या निवड समितीत 5 सदस्यांचा समावेश असेल. त्यासाठी त्यांनी काही अटीदेखील ठेवल्या आहेत. अर्ज करणाऱ्या खेळाडूंनी भारतासाठी कमीत कमी 7 कसोटी व‌10 वनडे सामने खेळलेले असावे. तसेच त्यांनी पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेला असावा. हे अर्ज 28 नोव्हेंबर पर्यंत स्वीकारले जातील.

(BCCI sacked the entire selectors including Chetan Sharma)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ एक, मूड्स अनेक! आयसीसीने दाखवली विराटची टी20 विश्वचषकातील प्रत्येक रिऍक्शन, एकदा पाहाच
आंद्रे रसेलने हद्दच केली पार! थेट मॉलमध्येच झाला NUDE, फोटो पाहिला का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---