---Advertisement---

विश्वविजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून बक्षिस, युवा खेळाडू होणार मालामाल

On: रविवार, जानेवारी 29, 2023 10:21 PM
Indian womens u19 team
---Advertisement---

शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला. 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ विजेता बनला. अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य इंग्लंड संघाला 7 विकेट्सने धूळ चारली आणि विश्वचषक ट्रॉफी जिंकली. हा विजय देशाची मान उंचावणारा ठरला. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी इंग्लंडला पराभूत करणाऱ्या भारताच्य या गुणवंत महिला खेळाडूंची दखल घेत बक्षीस घोषित केले.

19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक (Womens U19 T20 World Cup 2023) दक्षिण आफ्रिकेत पार पडला. रविवारी (29 जानेवारी) खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि महिला संघ आमने सामने होते. उभय संघांतील या सामन्यात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता होती. पण खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल होती. असात सामना कमी धावसंख्येवर खेळला गेला. आयसीसीने 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक पहिल्यांदा आयोजित केला होता आणि भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यापूर्वीही एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अशाच प्रकारे 2008 साली आयोजित केलेल्या पहिल्या पुरुष टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.

भारतीय युवा महिला क्रिकेटपटूंनी या सामन्यात केलेल्या नेतृत्रदीपक कामगिरीपुढे न्यूझीलंड संघाने गुडळे टेकले. संघाची कामगिरी पाहून बीसीसीआय सचिव जय शहा () यांनी आपल्या क्रिकेट बोर्डाची तिजोरी खोलली. सचिवांनी विश्वविजेत्या भारतीय 19 वर्षांखालील महिला क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफसाठी 5 कोटी रुपये बक्षीच घोषित केले. अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट शेअर करत जय शहा यांनी ही माहिती दिली. या पोस्टमध्ये शहांनी लिहिले की, “या विजयामुळे महिला क्रिकेट संघाचा दर्जा अधिकच उंचावला आहे.”

जय शहांनी भारताच्या या विश्वविजेत्या खेळाडूंना सन्मानासाठी देखील आमंत्रित केले. भारताचा पुरुष संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका खेळत आहे. उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यावेळीच युवा महिला संघाचा या स्टेडियवर सन्मान केला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“पुढच्या महिन्यात दुसरा वर्ल्डकप जिंकायचाय”, शफालीने व्यक्त केला आत्मविश्वास
BIG BREAKING! पोरींनी रचला इतिहास, U19 टी20 विश्वचषकावर भारताने कोरले नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---