नवी दिल्ली । जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी भारतात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु करण्यात आला आहे. मागील २ महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन दरम्यान जिथे अधिकतर गोष्टी ठप्प झाल्या आहेत. तिथे क्रीडा जगतातील सर्व खेळाडू मैदानाव्यतिरिक्त सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे दिसते. यादरम्यान खेळाडू आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत तर कधी आपले मजेशीर व्हिडिओंमार्फत चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसून आले.
भारतीय पुरुष क्रिकेटमध्ये जिथे सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचे काम अधिकतर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) करताना दिसले. तर भारतीय महिला क्रिकेट संघातून स्म्रीती मंधना (Smriti Mandhana), जेमिमाह रोड्रिगेज (Jemimah Rodrigues) आणि वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) या महिला खेळाडूंनी चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसल्या.
रविवारी (२४ मे) भारतीय महिला संघाची फलंदाज जेमिमाहचा एक म्युझिकल व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल, जो बीसीसीआयने (BCCI) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत जेमिमाह संगीतामार्फत लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ज्यामध्ये ती गाण्याबरोबरच एक छोटे गिटार वाजवतानाही दिसत आहे.
The Sunday Mashup ft. @JemiRodrigues 🎶🎶👏 https://t.co/bkv7ii8ntL
— BCCI (@BCCI) May 24, 2020
बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आपला रविवार संगीताने सुरु करा. आमची इन-हाऊस रॉकस्टार आपली प्रतिभा दाखवताना.”
बीसीसीआने आपल्या कॅप्शनमध्ये जेमिमाहसाठी ‘लिल जे’ (Lil J!) असेही लिहिले. भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटपटू जेमिमाह या व्हिडिओमध्ये गिटार वाजविण्याबरोबरच जुने गाणे गाताना दिसत आहे. ती या व्हिडिओत बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणे ‘चाँद सा रोशन चेहरा’, ‘आज-कल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘है अपना दिल तो आवारा’ आणि ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ अशाप्रकारची गाणे गाताना दिसत आहे.
या व्हिडिओच्या शेवटी जेमिमाहने लोकांना आपापल्या घरात राहण्याचे आवाहन केले आहे.
ट्रेंडिंंग घडामोडी-
-विश्वचषकात निवड होऊनही एकही सामना खेळायला न मिळालेले ५ भारतीय खेळाडू
-पाकिस्तानमधील मानवधिकार कार्यकर्ता म्हणतो, आफ्रिदी थोडी तरी लाज बाळग