---Advertisement---

टीम इंडियाच्या टी२०चे कर्णधारपद द्या रोहितला; माजी खेळाडूची बीसीसीआयकडे मागणी

---Advertisement---

नवी दिल्ली । भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही काळापासून स्वत:ला केवळ एक खेळाडू म्हणून नव्हे तर, एक चांगला कर्णधार म्हणूनही सिद्ध केले आहे. याच कारणामुळे क्रीडाजगतातून रोहितला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी सतत केली जात आहे.

त्याने कर्णधार विराट (Virat Kohli) कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच स्वत:ला सिद्ध करत अनेक सामनेही जिंकून दिल्या आहेत. यामध्ये निदाहास ट्रॉफी, आशिया चषकाबरोबरच अनेक द्विपक्षीय मालिकांचाही समावेश आहे.

रोहितकडे (Rohit Sharma) संघाचे कर्णधारपद सोपविण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये आता भारताचे माजी वेगवान गोलंदाज अतुल वासन (Atul Wassan) यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

रोहितला टी२० संघाचे कर्णधारपद सोपविले पाहिजे-

वासन यांनी सांगितले की, रोहितला विशेषत: टी२० क्रिकेट संघाचे (T20 Cricket Team) संघाचे नेतृत्व सोपविले पाहिजे. कारण त्याने आतापर्यंत स्वत:ला सिद्ध केले आहे.

स्पोर्ट्स कीडाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “मला वाटते की, रोहितला टी२० संघाचे नेतृत्व सोपविण्याची आवश्यकता आहे. कारण विराटला सर्व क्रिकेट प्रकारात भारताचे नेतृत्व करायचे आहे. परंतु रोहितनेदेखील दाखवून दिले आहे की, तो एक चांगला कर्णधार आहे. त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. तो पुढे येऊन नेतृत्व करताना दिसतो.”

“कसोटी क्रिकेटमध्ये विराट उत्कृष्ट आहे. पुढील विश्वचषकापर्यंत त्याने वनडेत संघाचे नेतृत्व केले पाहिजे. परंतु टी२० संघाचे नेतृत्व रोहितकडे सोपवून बीसीसीआय सहजरित्या विराटच्या कामाचा आणि मानसिक ताण कमी करता येऊ शकतो,” असेही वासन पुढे म्हणाले.

विराटने कसोटीत ५५ सामन्यांमध्ये, वनडेत ८९ सामन्यांमध्ये आणि टी२०त ३७ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. तर रोहितबद्दल बोलायचे झाले तर त्याने वनडेत १० सामन्यांमध्ये आणि टी२०त १९ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

रोहितने आतापर्यंत ३२ कसोटी सामने, २२४ वनडे सामने आणि १०८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत २१४१ धावा, वनडेत ९११५ धावा आणि टी२० २७७३ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-डेव्हिड वॉर्नरचा अक्षय कुमारच्या सुपरहिट ‘बाला’ गाण्यावर डान्स; विराटला दिले चॅलेंज…

-विराट कोहलीच्या ‘या’ चुकिमुळे भारत जिंकत नाही विश्वचषक

-जेलची हवा खावी लागलेले ५ क्रिकेटपटू; दोन नावं आहेत भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---