fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

डेव्हिड वॉर्नरचा अक्षय कुमारच्या सुपरहिट ‘बाला’ गाण्यावर डान्स; विराटला दिले चॅलेंज…

David Warner Virat Kohli Akshay Kumar Bala Song Video Watch Anushka Sharma Warner Invites Kohli on Tiktok

नवी दिल्ली । ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान तो टिक-टॉक स्टार बनला आहे. इतकेच नव्हे तर तो भारतातील अनेक भाषांच्या गाण्यांवर व्हिडिओ तयार करत आहे. नुकतेच त्याने तेलुगू, तमिळ आणि पंजाबी गाण्यांवर व्हिडिओ बनवला होता.

त्यानंतर आता त्याने बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) प्रसिद्ध गाण्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. वॉर्नरने अक्षयच्या ‘हाऊसफूल-४’ (Housefull-4) सिनेमातील ‘बाला-बाला’ या गाण्यावर डांस केला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

‘बाला-बाला’ (Bala-Bala) या गाण्यामध्ये अक्षयच्या डोक्यावर केस नव्हते आणि तो राजाच्या वेशभूषेत होता. तर दुसरीकडे वॉर्नरने सूट घालून डांस केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक क्रिकेटपटूंनी कमेंट केली आहे. काहींनी तर याने आता अधिकृतरित्या भान हरवले असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांनी त्याला बॉलिवूडमध्ये येण्याचाही सल्ला दिला आहे. वॉर्नरचा हा व्हिडिओ पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीदेखील (Virat Kohli) स्वत:चे हसू थांबवू शकला नाही. त्याने कमेंटमध्ये हसणाऱ्या ईमोजींचा वापर केला आहे.

वॉर्नरने लगोलग विराटला ड्यूएट करण्याचे चॅलेंजदेखील दिले. तसेच त्याने विराटला सल्ला दिला की, अनुष्का शर्मा (Anushka Sharma) त्याच्यासाठी टिक-टॉक (Tik-Tok) अकाऊंट तयार करू शकते. वॉर्नरकडे पाहून असे वाटत आहे की, त्याला आपल्या क्रिकेटपटू असणाऱ्या सहकाऱ्यांना आणि मित्रांना टिक-टॉकवर आणायचे आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचदेखील (Aaron Finch) टिक-टॉकवर आला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

-भविष्यात टीम इंडियाकडून अष्टपैलू म्हणून खेळण्याची क्षमता असलेले ३ खेळाडू

-विराट कोहलीच्या ‘या’ चुकिमुळे भारत जिंकत नाही विश्वचषक

-जेलची हवा खावी लागलेले ५ क्रिकेटपटू; दोन नावं आहेत भारतीय

You might also like