भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मालिकेत टीम इंडिया आधीच 2-0 अशी आघाडी घेतली असून, हा सामना जिंकून इंग्लंडचा क्लीनस्वीप करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शहा यांनी या सामन्यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, या सामन्यादरम्यान “डोनेट ऑर्गन्स, सेव्ह लाईव्हज” हा विशेष जागरूकता उपक्रम राबवला जाईल. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “खेळामध्ये समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद आहे. अवयवदान हे जीवनदान असते. एका योग्य निर्णयामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. चला एकत्र येऊ आणि समाजासाठी महत्त्वाचा संदेश देऊ!”
या उपक्रमाचा उद्देश अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना रोमांचक ठरण्यासोबतच सामाजिक जाणिवा वाढवणारा असेल. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे खेळाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठीही करता येतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
A New Initiative by ICC Chairman Jay Shah – “Donate Organs, Save Lives”.
– Sports isn’t just about competition, it’s a platform for a change and Jay Shah will kick start the new initiative during the third ODI at Narendra Modi Stadium ???? pic.twitter.com/k0XdLcHDcE
— Johns. (@CricCrazyJohns) February 10, 2025
???????????????????????? ????????????????????????, ???????????????? ???????????????????? ????????
Join the organ donation initiative on the 12th of February at the Narendra Modi Stadium in Ahmedabad! ????️
Pledge to donate your organs and make a difference!#TeamIndia | #DonateOrgansSaveLives | #INDvENG pic.twitter.com/NiG0YRE773
— BCCI (@BCCI) February 10, 2025
मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल दिसून येतील. खरंतर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा हा शेवटचा सामना असणार आहे. अशा परिस्थितीत, रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन त्यांच्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घेऊ इच्छितात. ज्यामुळे अर्शदीप सिंग, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. हे तिन्ही खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या संघाचा भाग आहेत.
इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा
हेही वाचा-
अहमदाबादमध्ये विक्रम! रोहित मालिकेतील शेवटच्या सामन्यात 11,000 धावांचा टप्पा गाठणार?
संघाला मोठा झटका! युवा अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर
IND vs ENG: हिटमॅनच्या दमदार पुनरागमनावर जडेजाचे मत, “रोहितची खेळी संघासाठी बूस्टर …






