भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) शनिवारी (३१ जुलै) एक बैठक पार पडली. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ आणि संयुक्त सचिव जयेश जॉर्ज या मंडळींनी सहभाग घेतला होता. या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गतवर्षी राहुल जोहरी यांच्या जाण्यानंतर बीसीसीआयच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे (सीईओ) पद रिकामे आहे. त्यामुळे या पदासाठी शोधमोहीम सुरू झाली आहे. इंडियन प्रीमियर लीगचे मुख्य कार्यकारी (सीओओ) अधिकारी हेमांग अमीन सध्या अंतरिम विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “लवकरच आम्हाला नवीन विशेष कार्यकारी अधिकारी मिळणार आहेत. याच विषयावर आमच्यात चर्चा सुरू आहे. राहुलच्या काळात त्यांनी एका एजन्सीची नेमणूक केली होती. आम्ही तेच करू किंवा थेट अर्ज मागवू. परंतु या प्रक्रियेबाबत अद्याप निर्धारित घेण्यात आलेला नाही.
बीसीसीआयच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त होण्यासाठी अर्जदाराकडे १०० कोटी वार्षिक उत्पन्न असलेल्या कंपनीमध्ये १० वर्ष काम करण्याचा अनुभव असायला पाहिजे. तसेच जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, हेमांग आमीन अर्ज देऊ शकतात का? यावर प्रतिक्रीया देत ते म्हणाले, “हो, जर त्यांची इच्छा असेल तर ते अर्ज देऊ शकतात. पण मला जितकी माहिती मिळाली आहे त्यावरून हे निश्चित आहे की, त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.”(Bcci to have new ceo hemang amin can apply too)
सीके नायडू क्रिकेट स्पर्धेची वयोमर्यादा २३ नव्हे तर २५ वर्ष
बीसीसीआयने सीके नायडू क्रिकेट स्पर्धेबाबतही या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सीके नायडू क्रिकेट स्पर्धा २३ वर्षांखालील वयोगटात खेळली जायची. परंतु कोरोनामुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा झाल्या नाहीत. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून आगामी हंगामात वयोमर्यादा २५ वर्ष असणार आहे. ही राज्याच्या अ संघासारखी संकल्पना असेल, ज्यातून रणजी संघाला खेळाडूंचा पुरवठा होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे असे आहे वेळापत्रक; पूर्ण संघ, ठिकाण अन् वेळ जाणून घ्या सर्वकाही
नॉटिंघमच्या खेळपट्टीचा फोटो आला पुढे; फलंदाज की गोलंदाज, पाहा कोणासाठी मदतशीर ठरेल हे मैदान?