भारताचा १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या (Under 19 World Cup) विजयाचा स्टार राजवर्धन हंगरगेकरला (Rajvardhan Hangargekar) आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाच चेन्नई सुपर किंग्स संघाने (Chennai Super Kings) १.५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याच्यावर वयाच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे क्रिडा आणि युवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या अष्टपैलू खेळाडूवर आपले खरे वय लपवल्याचा आरोप केला आहे. त्याच्यावर फसवणुकीचा आरोप असूनही बीसीसीआय कोणतीही कारवाई करण्याची शक्यता नाही.
वयोगट आंतरराज्य प्रणालीमध्ये येताना खेळाडूच्या हाडांच्या चाचणीच्या आधारे एज व्हेरिफिकेशन होते. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की, जेव्हा राजवर्धनने २०१६-१७ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र १६ वर्षाखालील स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले होते. तेव्हा TW3 चाचणीने पुष्टी केली गेली होती की, हंगरगेकरचे वय त्याने दिलेल्या कागदपत्रांनुसार ग्राह्य धरले गेले होते.
बकोरिया यांच्या म्हणण्यानुसार, इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत हंगरगेकर याची जन्मतारीख १० जानेवारी २००१ होती. मात्र त्याच्या मुख्याध्यापकांनी त्याची जन्मतारीख बदलली होती. इयत्ता ८ वीमघ्ये शाळेत नवीन प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी राजवर्धनची जन्मतारीख बदलून १० नोव्हेंबर २००२ केली होती.
दरम्यान यावर्षी १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकादरम्यान या वेगवान गोलंदाजाचे वय २१ वर्षे होते. या अष्टपैलू खेळाडूने १९ वर्षाखालील विश्वचषकात ५ विकेट घेतल्या होत्या. युगांडाविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करताना त्याने ८ धावांत २ बळी घेतले होते. त्याने आयर्लंडविरुद्ध १७ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या होत्या. गोलंदाजी आणि फलंदाजीतील त्याची प्रतिभा पाहून चेन्नई सुपर किंग्सने त्याला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात दीड कोटींना विकत घेतले आहे.
हंगरगेकर सातत्याने १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. तसेच मोठे फटकेही मारू शकतो. त्याच्या क्षमतेमुळे तो प्रसिद्धी मिळाली आणि त्याला भारताचे भविष्य मानले जात होते, मात्र त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची बीसीसीआय चौकशी करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय, असे कसे झाले?, रिषभ सामनावीर बनल्यानंतर कर्णधार रोहितची रिऍक्शन होती पाहण्यासारखी- VIDEO
प्रकरण चिघळलं! पाकिस्तान बोर्डावर धोखाधडीचा आरोप करणारा खेळाडू पीएसएलमधून बॅन, वाचा सविस्तर
प्रो कबड्डी: गुजरात जायंट्सचा यू मुंबावर महत्त्वपूर्ण विजय, प्लेऑफमध्ये मारली धडक