इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कोरोना व्हायरसचा बायो बबलमध्ये झालेल्या शिरकावामुळे ४ मे रोजी आयपीएल २०२१ चा हंगाम २९ सान्यांनंतर स्थगित करण्यात आला होतेा. त्यानंतर आता उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना सांगितले की, यूएईला जाण्यापूर्वी सर्व सदस्यांनी कोरोनाची दोन्ही लस घ्यायच्या आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, सर्व संघांना सांगितले गेले आहे की सर्व सदस्यांना यूएईला जाण्यापूर्वी कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्यायचे आहेत. यासह, यूएईला पोहोचण्यास कोणतीही अडचण येणार नाही. हे सर्वांना माहिती आहे की, यूएईमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडू आणि इतर सदस्यांना ७ दिवस विलगिकरणात ठेवणे आवश्यक आहे. यानंतर, खेळाडूची कोरोनाची चाचणी नकारात्मक आल्यानंतर प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.
सर्वाधिक १३ सामने दुबईमध्ये होणार आहेत.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. उर्वरित ३१ सामन्यांपैकी १३ सामने दुबईमध्ये खेळले जाणार आहेत. याशिवाय १० सामने हे शारजाह आणि ८ सामने अबुधाबीमध्ये खेळले जाणार आहेत. आयपीएलनंतर टी२० विश्वचषकाचे सामनेही यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्व देशांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेश करायला आवडेल, जेणेकरून त्यांना टी२० विश्वचषकची तयारी करायला संधी मिळेल.
मात्र, अजूनही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागाबद्दल शंका आहे. तरी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने म्हटले आहे की, त्याच्यासाठी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळणे कठीण आहे. हा केकेआर संघासाठी खूप मोठा धक्का आहे.
आयपीएल २०२० चा संपूर्ण हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचव्यांदा जेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
नीरजला ‘आदर्श’ म्हणणारे ट्वीट पाकिस्तानी भालाफेकपटूने केले डिलीट; उमटतायत प्रतिक्रिया
नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी करताच त्याच्या गावी झाला जल्लोष! व्हिडिओ पाहून तुम्हीही आनंदाने नाचाल