भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. शुक्ला यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे. आपल्या सहा वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळाची त्यांनी सोमवारी (१८ जुलै) शपथ घेतली. बीसीसीआयच्या घटनेनुसार कोणताही व्यक्ती एकाच वेळी दोन पदे भूषवू शकत नाही. गुरुवारी (२१ जुलै) होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांची नुकतीच छत्तीसगडमधून राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, “घटनेनुसार शुक्लांना पद सोडावे लागेल. बहुतांश पदाधिकारी इंग्लंडमध्ये असल्याने चर्चेची संधी मिळाली नाही. शुक्ला देखील त्यांच्या राज्यसभेतील वचनबद्धतेत व्यस्त होते. बैठकीत त्यावर चर्चा करण्याची संधी मिळेल. पण याबाबतचा अंतिम निर्णय केव्हा जाहीर होईल हे सांगता येत नाही.”
काय आहे बीसीसीआयचे नियम
आयपीएल २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआय मध्ये अनेक बदल झाले होते. लोढा समितीने आपल्या संविधानात बदल करण्याचे निर्देश दिलेले. त्यानुसार एक व्यक्ती एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पदांवर कार्यरत राहू शकत नाही. तसेच तो व्यक्ती कोणत्याही संविधानिक पदावर असला तर त्याला बीसीसीआयमध्ये भाग घेता येणार नाही. तसेच कोणीही एका पदावर तीन वर्षापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. याच नियमामुळे बीसीसी अध्यक्ष सौरव गांगुली यांना देखील आपले पद लवकर सोडावे लागू शकते.
राजीव शुक्ला यांनी यापूर्वी बीसीसीआयमध्ये अनेक पदे भूषवली आहेत. ते सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. तसेच याआधी बीसीसीआयचे सचिव आणि आयपीएलचे गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. तसेच सुरुवातीला त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापक पदावरदेखील काम केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या झंझावाती शतकावर गर्लफ्रेंडही फिदा, आनंदाच्या भरात केलेली पोस्ट वेधतेय लक्ष
इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन