ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघाची सेवा करत आहे. पण २०१८ मध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर मोठी कारवाई केली गेली होती. याच कारणास्तव वॉर्नर सध्य ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनू शकत नाहीये. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी याविषयी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते वॉर्नरला आता कर्णधारपदाची संधी मिळाली पाहिजे.
ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे खेळाडू डेविड वॉर्नर (David Warner), स्टीव स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांनी २०१८ मध्ये चालू सामन्यात चेंडूशी छेडछाड (ball tampering) केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकट बोर्डने या तिघांवर मोठी कारवाई केली. वॉर्नर आणि स्मिथला एक वर्षांसाठी क्रिकेटवर बंदी घातली गेली होती. तसेच बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांसाठी बंदी घातली गेली होती. वॉर्नर या प्रकरणात मख्य दोषी होता. याच कारणास्तव त्याला ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवता येणार नाही, असा निर्णय घेतला गेला होता. पण आता ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांना वाटते की, वॉर्नरने त्याच्या चुकीची शिक्षा भोगली आहे आणि आता त्याला संघाचे नेतृत्व करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे.
डेविड वॉर्वरची बंदी उठवावी – ग्रेग चॅपल
ग्रेग चॅपल एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले होते की, “जे झाले त्यात नक्कीच डेविड वॉर्नरची भूमिका महत्वाची होती. पण यात तो एकटा सहभागी नव्हता. मला नाही माहीत, की त्याला वेगळी वागणूक का दिली जात आहे. त्याने स्वतःची शिक्षा पूर्ण केली आहे. तो एक चांगला लीडर आहे आणि मला यात काहीच शंका नाहीये की, जर त्याला संधी मिळाली, तर त्याने ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे केले असते. माझ्या मते त्याला खूप शिक्षा मिळाली आहे आणि आता त्याच्यावरील बंदी उठवली गेली पाहिजे.”
स्टीव स्मिथवर देखील या प्रकरणात नेतृत्वाची बंदी घातली गेली होती. पण ऍशेस २०२१-२२ हंगामापूर्वी त्याला ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार बनवले गेले होते. स्मिथ आजही ही भूमिका पार पाडत आहे. काही दिवसांपूर्वीच डेविड वॉर्नरला मिळणाऱ्या या चुकीच्या वागणूकीवर त्याची पत्नीने आवाज उठवला होता. वॉर्नर जर भारतात आयपीएल संघाचे नेतृत्व करू शकतो, तर ऑस्ट्रेलियन संघाचे का नाही ?, असा प्रश्न त्याच्या पत्नीने उपस्थित केला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतच्या झंझावाती शतकावर गर्लफ्रेंडही फिदा, आनंदाच्या भरात केलेली पोस्ट वेधतेय लक्ष
विजयानंतरही रोहितला दिसली टीम इंडियात कमतरता! म्हणाला…
श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”