भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे आचरण अधिकार विनीत सरन यांनी शुक्रवारी (५ ऑगस्ट) मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या मालकीण नीता अंबानी यांना महत्वाची नोटीस पाठवली आहे. नीता अंबांनीवर हितसंबंधांच्या संघर्षाचे आरोप करण्यात आले आहेत आणि याच कारणास्तव त्यांना ही नोटीस पाठवल्याचे सांगितले गेले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विनीत सरन (Vinit Saran) यांना काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या आचरण अधिकारी (Bcci Ethics Officer Vinit Saran) पदी नियुक्त केले गेले आहे. तसेच ते बोर्डासाठी लोकपालाची भूमिकाही पार पाडणार आहेत. तत्पूर्वी डी के जैन यांनी ही जबाबदारी पार पाडली होती आणि आता सरन यांची या पदावर नियुक्त केली गेली आहे. नीता अंबानी (Nita Ambani) यांना जी नोटीस पाठवली गेली आहे, त्यामागे मध्य प्रदेशचे क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांचा हात असल्याचे समोर येत आहे. गुप्ता यांनी तक्रार केल्यानंतर अंबानींना नोटीस पाठवली गेली आहे.
गुप्तांच्या आरोपानंतर सरन यांनी बीसीसीआयच्या माध्यमातून नीती अंबानींना नोटीस पाठवली. यामध्ये लिहिले गेले आहे की, “तुम्हाला सूचित करण्यात येते की, बीसीसीआयच्या आचरण अधिकाऱ्यांनी नियम ३९ (ब) अंतर्गत एक तक्रार मिळाली आहे. ज्यामध्ये तुमच्यावर हितसंबंधांना विरोध करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. तुम्हाला २ सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी याप्रकरणी लिखित उत्तर देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.” नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे नीता अंबानींना आता या आरोपांचे उत्तर २ सप्टेंबरपर्यंत द्यावे लागणार आहे.
गुप्ता यांच्या आरोपांनुसार मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीच्या मालकाच्या रुपात नीता अंबानींना नियमांचे उल्लंघन केले आहे. नीत आंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. वायकॉम १८ ही रिलायंन्स इंडस्ट्रीजचीच एक कंपनी असून त्यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी आयपीएलचे मीडिया राईट्स विकत घेतले आहेत. हे राईट्स विकत घेण्यासाठी वायकॉम १८ कंपनीने तब्बल २३,७५८ कोटी रुपयांची बोली लावली असून याच पार्श्वभूमीवर हा वाद सुरू झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
चौथ्या टी२०पूर्वी कार्तिकची वेस्ट इंडिजला चेतावणी; म्हणाला, ‘मालिका जिंकण्याच्या हेतूनेच…’
काय आहे ‘कुलचा’ जोडी फुटण्याचे कारण? माजी दिग्गजाने सांगितली निवडकर्त्यांची अडचण
इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजाराची बॅट पकडतेय स्पीड, ४ चौकारांसह ठोकले शानदार अर्धशतक