मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 4 विकेट्स राखून जिंकला असून मालिकेत त्यांना 0-1 अशी आघाडी देखील घेतली. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 208 धावांचे आव्हान उभे केले होते, पण तरीदेखील ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. पाहुण्या संघाने 19.4 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर हा विजय मिळवला. चला तर या लेखात जाणून घेऊया भारताच्या पराभवाची चार प्रमुख कारणे.
खराब क्षेत्ररक्षण –
ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात कॅमरून ग्रीन पहिल्यांदाच सलामीवीराच्या रूपात खेळला. डावाच्या आढव्या षटकात हर्षल पटेलने कॅमरून ग्रीनचा झेल सोडला आणि नंतर त्याने स्वतःछे अर्धशतक पूर्ण केले. ग्रीनने या सामन्यात 30 चेंडूत 61 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला. हर्षलने हा झेल सोडल्यानतंर पुढच्याच षटकात केएल राहुलने स्टीव स्मिथचा सोपा झेल सोडला. स्मिथने या सामन्यात 35 धावांचे महत्वाचे योगदान दिले. तसेच डावाच्या 18 व्या षटकात मॅथ्यू वेड (Matthew Wade) याला देखील हर्षल पटेल कडून जीवनदान मिळाले होते.
मॅथ्यू वेडची वादळी खेळी –
मॅथ्यू वेडचा झेल सोडणे भारतीय संघाला चांगलेच महागात पडले. वेड तेव्हा फलंदाजी करायला आला होता, जेव्हा ऑस्ट्रेलियने 145 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. संघाला शेवटच्या 6 षटकामध्ये 64 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर त्यानंतर वेटने टिम डेविडसोबत मिळून महत्वाची भागीदारी पार पाडली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. त्याने एकूण 21 चेंडू खेळले आणि 200 च्या स्ट्राईक रेटने 45 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजांचे निराशाजनक प्रदर्शन –
मागच्या काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाज शेवटच्या षटकांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात हर्षल पटेलने संघात पुनरागमन केले, पण संघासाठी काही खास योगदान देऊ शकला नाही. तसेच भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. भुवनेश्वरने टाकलेल्या 17 व्या षटकात 15 धावा खर्च केल्या, तर पुढच्याच षटकात हर्षल पटेलने 22 धावा दिल्या. त्यानंतर भुवनेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्या शेवटच्या षटकात 16 धावा खर्च केल्या. या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर मॅथ्यू वेडने सलग तीन चौकार मारले आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सोपा केला. गोलंदाजांच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे भारताने हा सामना 4 विकेट्सने गमावला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकेवेळी अतिशय मोठी शारिरीक समस्या असलेला गेल पुढे झाला ‘युनिवर्सल बॉस’
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
अस काय घडलं की भर मैदानात रोहितने पकडला कार्तिकचा गळा? पाहा व्हिडिओ