भारत-ऑस्ट्रेलिया संघात बाॅर्डर-गावसकर मालिकेतील शेवटचा म्हणजेच पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात पदार्पण करणारा अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टर (Beau Webster) आधीच ‘जसप्रीत बुमराह’च्या (Jasprit Bumrah) भीतीत आहे. वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारताच्या या स्टार वेगवान गोलंदाजाचा सामना करणे मोठे आव्हान असेल, असा विश्वास या 31 वर्षीय खेळाडूला आहे.
सिडनीमध्ये भारतीय फलंदाजी पुन्हा अपयशी ठरली. संपूर्ण संघ अवघ्या 185 धावांवर गारद झाला. मात्र दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने सलामीवीर उस्मान ख्वाजाला बाद करत भारताला यश मिळवून दिले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ब्यू वेबस्टर (Beau Webster) म्हणाला, “या विकेटवर फलंदाजीची पद्धत आहे. त्यांच्या संघात जसप्रीत बुमराहसारखा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे आणि तो आमच्या संपूर्ण फलंदाजी युनिटला आव्हान देईल यात शंका नाही.”
जसप्रीत बुमराहचे कौतुक करताना तो म्हणाला, “तो त्याच्या लाईन आणि लेंग्थच्या बाबतीत अप्रतिम आहे. जेव्हा खेळपट्टीवरून काही मदत मिळते, तेव्हा त्याचा सामना करणे खूप आव्हानात्मक असते. ती खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल होती आणि खेळपट्टीवर गवत असल्याने चेंडू बराच काळ नवीन राहिला. ही पूर्णपणे जर्जर खेळपट्टी आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “स्कॉटीने (बोलंड) शानदार गोलंदाजी केली. तो संघात परत आल्यापासून जागतिक दर्जाचा गोलंदाज का आहे हे त्याने दाखवून दिले आहे. मला वाटले की आज सर्व गोलंदाज खरोखर चांगले आहेत आणि त्यांना 200च्या आत बाद करणे खूप चांगले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; रोहित शर्माची निवृत्ती फिक्स? निवडकर्त्यांनी स्पष्टच सांगितले
3 खेळाडू जे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माची जागा घेऊ शकतात, मराठमोळ्या ऋतुराजकडे मोठी संधी
5 भारतीय गोलंदाजांनी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा केली सलामीवीरांची शिकार