भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोना लागणीची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अशात सर्व खेळाडू आपल्या घरी पोहोचले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन देखील घरी परतला आहे. परंतु तो विलग्नवासात आहे. अशातच त्याने आपल्या प्रेयसीच्या वाढदिवसा दिवशी एक लक्षवेधी पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.
सॅम करनची प्रेयसी इसाबेला विलमॉट हीचा काल वाढदिवस होता. परंतु तो विलग्नवासात असल्यामुळे दोघांची भेट होऊ शकली नाही. तिला शुभेच्छा देण्यासाठी त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर इसाबेला विलमॉटसोबतचा सेल्फी शेअर केला.
यावर त्याने कॅप्शन म्हणून, “इसाबेल विलमॉट तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मला माफ कर, आज मी तुझ्यासोबत नाहीये. मी आशा करतो की तुझा आजचा दिवस उत्कृष्ट जावो. मी तुला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस त्याबद्दल तुझे आभार.” त्याच्या या भावुक पोस्टला साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे.
https://www.instagram.com/p/COzhfxBjiao/?igshid=10hpdednsiwb3
चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी
गतवर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ व्या क्रमांकांवर समाधान मानावे लागले होते. परंतु चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ जोरदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच चेन्नई संघातील खेळाडू जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. यंदा चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने या हंगामात ७ सामने खेळले होते. यात त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत सॅम करनने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने ७ सामने खेळत ५२ धावा केल्या तसेच ९ गडी देखील बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रमवारी: भारतीय संघाचे स्थान धोक्यात; ‘असं’ झालं तर न्यूझीलंड होऊ शकतो अव्वलस्थानी विराजमान
फक्त कोहली-आझम असे फलंदाज आहेत, ज्यांची फलंदाजी शैली सर्वजण फॉलो करतात; ‘आशियाई ब्रॅडमन’चे बोल
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा वाढणार रोमांच, ३ नव्हे ‘इतक्या’ सामन्यांची होणार टी२० मालिका!