रणजी ट्रॉफी २०२१-२२ (Ranji Trophy 2021-22) चा हंगामातील अंतिम सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात मध्य प्रदेश संघाने बंगालवर १७४ धावांनी विजय मिळवत २३ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे. तर मुंबई संघाचा उत्तर प्रदेशविरुद्धचा दुसरा उपांत्य फेरी सामना अनिर्णीत राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले आहे. अशाप्रकारे आता मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफी जिंकण्यासाठी अंतिम लढत होईल.
मुंबई (Mumbai) संघाला अंतिम फेरीत पोहचवण्याच्या मागे फलंदाज सरफराज खान याने महत्वाची भुमिका पार पाडली आहे. त्याने या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक राखला आहे. शेवचा सामना बाकी असताना आतापर्यंत कोणत्या खेळाडूंनी या हंगामात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली हे आपण पाहणार आहोत.
सर्वाधिक धावा- मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाजा सरफराज खान (Sarfaraz Khan) या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्याने ५ सामन्यांत ७ डावांमध्ये १३३.८३च्या सरासरीने ८०३ धावा केल्या आहेत.
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या – बिहार संघाच्या शाकिबुल गनीने मिझोराम विरुद्ध ४०५ चेंडूत ३४१ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ५६ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.
फलंदाजीची सरासरी – नागालॅंडच्या चेतन बिस्टने या हंगामातील ३११.५० च्या सर्वोत्तम फलंदाजीची सरासरी नोंदवली आहे. त्याने ४ सामन्यातील ६ डावांमध्ये ६२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो चार वेळा नाबाद राहिला आहे.
सर्वाधिक शतक – नागालॅंडच्या चेतन बिस्टने या हंगामात पाच शतके झळकावली आहेत. त्याच्यानंतर सरफराज खानचा क्रमांक लागतो. त्याने तीन शतके केली आहेत.
सर्वाधिक अर्धशतके – मध्य प्रदेशचा रजत पाटीदार आणि मुंबईचा शम्स मुलाणी या यादीत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी प्रत्येकी ५-५ अर्धशतके केली आहेत.
सर्वाधिक षटकार – मुंबईच्या सरफराज खानने आतापर्यंत १६ षटकार मारले असून शेवटचा सामना खेळायचा बाकी आहे. यामुळे या यादीत तोच अव्वल राहणार आहे.
सर्वाधिक चौकार – बिहार संघाच्या शाकिबुल गनीने या हंगामात ९७ चौकार मारले आहेत.
सर्वाधिक विकेट्स – ही कामगिरी मुंबई संघाचा अष्टपैलू खेळाडू शम्स मुलाणी ३७ विकेट्स घेत केली आहे. फलंदाजी बरोबर गोंलदाजीतही तो विशेष कामगिरी करत आहे.
सर्वोत्तम गोलंदाजी- उत्तराखंडच्या मयांक मिश्राने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात ४४ धावा देत ७ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ही या हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली आहे.
सर्वोत्तम यष्टीरक्षक – हैद्राबादचा यष्टीरक्षक अनंत प्रतीकने २१ खेळाडूंना बाद केले आहे. त्यातील ११ झेल आणि ३ स्टम्पिंग आहे.
सर्वाधिक झेल – हा विक्रम मध्य प्रदेशच्या रजत पाटीदारच्या नावावर आहे. त्याने १७ झेल घेतले आहेत.
सर्वाधिक भागीदारी- बिहार संघातील शाकिबुल गनी आणि बाबुल कुमार या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५३८ धावांची भागीदारी रचली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ENG vs NZ | इंग्लंडला मोठा झटका, शेवटच्या कसोटीतून दिग्गज गोलंदाजाची माघार
‘भारतासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हा खेळाडू योग्य’, झहीर खानने सांगितले कारण