---Advertisement---

क्रिकेटप्रेमी सज्ज! चॅंपियन्स ट्रॉफीमध्ये होणार चुरशीची लढत

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025 8:11 PM
---Advertisement---

चाहते आतुरतेने भारत आणि पाकिस्तान मधील महासामन्याची वाट बघत आहेत. प्रत्येकाच्या तोंडी भारत पाकिस्तान सामन्याची चर्चा आहे. तत्पूर्वी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमधील उद्या एक सामना खेळला जाणार आहे. उद्याही महासामना बघायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 22 फेब्रुवारी शनिवारी रोजी सामना होणार आहे. उद्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ समोरासमोर असणार आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये 22 फेब्रुवारी रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सामना खेळला जाईल. दोन्ही संघाचा हा स्पर्धेमधील पहिला सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ जिंकण्याच्या तयारीतच मैदानावर उतरतील. इंग्लंडने महासामन्यापूर्वी त्यांच्या संघाची प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे.

इंग्लंडने या सामन्यासाठी युवा यष्टीरक्षक फलंदाज जैमी स्मिथला त्यांच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान दिले आहे. फिल साल्ट आणि बेन डकेट डावाला सुरुवात करतील. यानंतर तिसऱ्या नंबर वर जो रूट तसेच चौथ्या क्रमांकावर हैरी ब्रूक आणि पाचव्या क्रमांकावर जैमी स्मिथ खेळताना दिसतील. यानंतर कर्णधार जॉस बटलर आणि अष्टपैलू लियाम‌ लिविंगस्टोन खेळताना दिसून येतील. गोलंदाजीसाठी ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड त्याच्यासोबत फिरकीपटू आदिल रशीद खेळताना दिसतील.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी सहाय्यक ठरू शकते.‌ जमिनीवर पाण्याच्या थेंबाचा जास्त प्रभाव नसेल त्यामुळे टॉस करताना कोणतीही अडचण येणार नाही.

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- फिल साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हैरी ब्रूक, जॉस बटलर (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि मार्क वुड.

ऑस्ट्रेलिया संघाचे स्क्वाड– मैथ्यू शॉर्ट, ट्रेविस हेड, जैक फ्रेजर-मैकगर्क, स्टीव स्मिथ (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट, बेन ड्वारशुइस, एडम ज़म्पा, तनवीर सांघा, नाथन एलिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन आणि एलेक्स केरी.

हेही वाचा 

मोहम्मद शमीने उलगडले ‘फ्लाइंग किस’ सेलिब्रेशनचे रहस्य, रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा होता पाठिंबा

“विराट कोहली दबावात? पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी खळबळजनक विधान!”

भारत-पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ विजेते कोण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---