चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात भारताने विजय मिळवून केली आहे. पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्ध हार पत्करावी लागली आहे. रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी पाकिस्तान आणि भारत हे दोन संघ समोरासमोर असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. वनडे फॉरमॅट मध्ये नेहमीच पाकिस्तानचा भारतावर वरचष्मा राहिला आहे. पण भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात कोणत्या खेळाडूंनी सगळ्यात जास्त ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा किताब जिंकला आहे ? या यादीत किती भारतीय खेळाडू आहेत ते जाणून घेऊया.
भारत-पाकिस्तान सामन्यात सर्वात जास्त वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडू सौरव गांगुली यांचे नाव अव्वलस्थानी आहे. सौरव गांगुली यांनी पाकिस्तान विरुद्ध 53 वनडे सामन्यात 8 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जिंकला आहे. तसेच, सचिन तेंडुलकर हे पाकिस्तान विरुद्धच्या 69 सामन्यात 8 वेळा प्लेअर ऑफ द मॅचने सन्मानित झाले आहेत. यानंतर पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांचे नाव आहे. भारताविरुद्धच्या 25 वनडे सामन्यात इंजमाम उल हक यांनी 5 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब मिळविला आहे. याशिवाय एमएस धोनी, सईद अनवर आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी 5 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जिंकला आहे.
त्याचवेळी, या यादीतील इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानचे आकिब जावेद, सलीम मलिक आणि युनूस खान यांनी प्रत्येकी 4 वेळा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जिंकला आहे. याशिवाय, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन, ऐजाज अहमद, जावेद मियांदाद, विराट कोहली आणि मोहम्मद युसूफ यांना प्रत्येकी 3 वेळा प्लेअर ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले आहे. तथापि, रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार कोणाला दिला जाईल हे पाहणे मनोरंजक असेल. रविवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एकमेकांसमोर येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या :
IND vs PAK: टाॅस हरणार तो संघ सामना गमावणार! पाहा धक्कादायक आकडेवारी
“अनिल कुंबळेने गौतम गंभीरसमोर ठेवली मोठी मागणी, निर्णय घेणे टाळता येणार नाही!”
भारत विरुद्ध पाकिस्तान: कोणत्या फलंदाजांनी ठोकलीत सर्वाधिक शतके? टॉप-5 मध्ये किती भारतीय?






