---Advertisement---

शोएब अख्तर म्हणतोय तरी काय? भारताच्या विजयावर गोंधळलेलं वक्तव्य!

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025 5:18 PM
India & Pakistan
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने शानदार अशी सुरुवात केली आहे. शुबमन गिलने 101 धावांची तुफानी खेळी केली, त्याचसोबत गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेलनेही चांगली गोलंदाजी केली., आणि बांगलादेशचा 6 विकेट्सनी पराभव केला. आता 23 फेब्रुवारी रोजी भारतीय संघाचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. तत्पूर्वी या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भारत पाकिस्तानचा हा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातला दोन्ही संघांमधील 6वा सामना आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने मोठ वक्तव्य केल आहे.

त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शोएब अख्तर ने 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याबद्दल स्वतःचे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद आमच्याकडे आहे. पण भारतीय संघाचे होम ग्राउंड यावेळी दुबई आहे. भारतीय संघाने स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. आणि पाकिस्तानला माहिती आहे की, भारतीय संघाचे फलंदाज त्यांची धुलाई करणार आहेत. कारण भारतीय संघाचे फलंदाज कधीही संपू शकत नाहीत. तसेच गोलंदाजही त्यांच्याकडे भरपूर आहेत. फलंदाजीच्या नजरेने बघितले तर भारतीय संघ स्पर्धेतील सगळ्यात मजबूत संघ आहे. त्यामुळे मला वाटते की 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय संघ हारावा. असे तो हसत-हसत म्हणाला. पण तरीही भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची दावेदार आहे. असंही त्याने वक्तव्य केलं.

शोएब अख्तर पुढे म्हणाला, भारतीय संघाला हरवणे सोपे काम नाही. तो म्हणाला, मला मनापासून वाटते की, भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चांगले यश मिळवावे. पण ते 23 फेब्रुवारी नंतर . आता पाकिस्तानचा सामना आहे त्यासाठी मी खूप उत्साही आहे.

भारतीय संघाच्या सामन्याआधी पाकिस्तान संघाला झटका लागलेला आहे. कारण सलामीवीर फलंदाज फखर जमान दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघात इमाम उल हकला संघात स्थान मिळाले आहे.

हेही वाचा 

पाकिस्तानचा पराभव आणि दिग्गजाचा संताप! खेळाडूंना झणझणीत सुनावणी

भारतीय संघाचा दबदबा कायम! गुणतालिकेतील नवीन समीकरणे जाणून घ्या

शिखर धवनला मिळाली नवी जीवनसाथी? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---