आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोर येथे पार पडणार आहे. त्यापुर्वी फ्रॅंचायझी आणि खेळाडू तयारीला लागले आहेत. लिलावापुर्वी इंग्लंडचा जेसन राॅय याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये धुमाकूळ घातला आहे. राॅयने लाहोर कलंदर्सविरुद्धच्या सामन्यात फक्त ४९ चेंडूंमध्ये शतक लगावले आहे. पीएसएलच्या १५ व्या सामन्यात शाहीन अफ्रीदी आणि राशिद खान यांच्या चेंडूवर त्याने मोठे फटके मारले. रॉयचे टी२० मधील हे पाचवे शतक आहे. जेसन रॉय पीएसएलच्या इतिहासात शतक झळकावणारा १२ वा खेळाडू आहे. याशिवाय पीएसएलमध्ये शतक झळकावणारा तो क्वेटा ग्लॅडिएटर्सचा पहिला फलंदाज ठरला. टी२० क्रिकेटमध्ये ७००० धावा करणारा रॉय हा जगातील ३२वा आणि इंग्लंडचा ७ वा फलंदाज ठरला आहे. पीएसएलमधील इंग्लंडच्या रॉयचा हा पहिलाच सामना होता.
लाहोर कलंदर्स विरुद्ध इंग्लंडच्या राॅयने ५७ चेंडूत ११६ धावा केल्या आणि बाद झाला. त्याने ११ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्याला डेविड विसे याने बाद केले आणि पव्हेलियनमध्ये पाठवले. पण बाद होण्यापुर्वी त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. लाहोर कलंदर्स संघाने सुरुवातीला फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावत २०४ धावा केल्या.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणुन ओळखला जातो. शाहीन आफ्रिदीच्या चेंडूंवर सुद्धा रॉयने मोठे फटके मारले. त्याने आफ्रिदीच्या चेडूंवर अनेक षटकार सुद्धा लगावले. दिग्गज गोलंदाज म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या राशिद खानच्या चेंडूंवर सुद्धा त्याने मोठे फटके खेळले.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात त्याच्यावर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जेसन राॅयला आता फ्रॅंचायझी विकत घेण्यास तयार होतील. आता या हंगामात त्याच्यावर कोणता संघ बोली लावेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागीलवर्षी आयपीएल २०२१ मध्ये सनराइजर्स हैदराबाद संघाने २ कोटी रुपयांना विकत घेतले होते. २०२१ च्या आयपीएलमध्ये त्याने ५ डावात १५० धावा केल्या होत्या.
राॅयने आत्तापर्यंतच्या आपीएल कारकिर्दीत १३ सामन्यांत ३२९ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये तो दिल्ली, हैद्राबाद आणि गुजरात संघांसाठी खेळला आहे. नुकत्याच खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेच्या सराव सामन्यांमध्ये सुद्धा राॅयने चमकदार कामगिरी केली होती आणि ३६ चेंडूतच शतक लगावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे आयपीएलमध्ये त्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
टूर वॉश! इंग्लंड महिला संघाचाही ऑस्ट्रेलियात सुपडा साफ; १९ सामन्यांनंतरही विजयाची पाटी कोरी