इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (8 एप्रिल) दुसरा सामना सायंकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर चेन्नईने 7 विकेट्स राखून विजय आपल्या नावे केला. या विजयानंतर चेन्नईच्या गोटात आनंद असला तरी त्यांचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापन व कर्णधाराची चिंता वाढलीये.
चेन्नईने मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजय मिळवला. या विजयात भारतीय खेळाडूंचे विशेष योगदान राहिले. या सामन्यात चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अष्टपैलू बेन स्टोक्स व मोईन अली हे सहभागी झाले नव्हते. स्टोक्सच्या टाचेला दुखापत झाली आहे. तर, अली याचे पोट बिघडल्याने त्याला काहीशी कमजोरी वाटत होती. त्याचवेळी या सामन्यात गोलंदाजी करताना आपले पहिलेच षटक टाकत असताना प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहर याला देखील दुखापत झाली. तो सामन्यात केवळ एकच षटक गोलंदाजी करू शकला.
आता या सर्व खेळाडूंच्या दुखापतीबद्दल माहिती मिळत असून, चेन्नई संघाचे टेन्शन वाढले आहे. चहर याची पाठीची दुखापत पुन्हा एकदा चिघळली असल्याने तो आता काही महत्त्वाच्या सामन्यांना मुकु शकतो. जवळपास महिनाभर तो मैदानापासून बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्याच्याबरोबरच स्टोक्स हा देखील किमान आठवडाभर मैदानात उतरू शकणार नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्ध 12 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी आहे. असे असताना अली मात्र पुढच्याच सामन्यात पुन्हा एकदा पुनरागमन करेल.
हंगाम सुरू होण्याआधीच चेन्नईचा अष्टपैलू कायले जेमिसन दुखापतीमुळे बाहेर पडला होता. त्याच्या जागी सिसांडा मगाला याची निवड केली गेली आहे.
(Ben Stokes And Deepak Chahar Might Miss Important Part Of IPL 2023 For CSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: वानखेडेवर झाला ‘धोनी..धोनी’चा जयघोष, व्हिडिओ होतोय वेगाने व्हायरल
“मला माहितीच नव्हतं संघात घेतलंय, टॉसच्या दोन मिनिट आधी माही आणि फ्लेमिंगने सांगितलं तुला खेळायचंय”, रहाणेचा मोठा खुलासा






