---Advertisement---

स्टोक्सचा जोरदार बाउन्सर धडकला रोहितच्या हेल्मेटला अन् घडलं असं काही, पाहा फोटो

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 3:31 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे युवा गोलंदाज अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी अहमदाबादमध्ये चालू असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन करत, इंग्लंड संघाचा डाव २०५ धावांवर संपुष्टात आणला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश येताना दिसत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ७२ षटकात ६ विकेट गमावत १८७ धावा केल्या आहेत. दरम्यान भारताचा सलामीवीर रोहित शर्मा जखमी होता होता वाचला.

इंग्लंड संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना बेन स्टोक्सने ५५ धावांची खेळी केली होती. त्याला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले होते. त्यानंतर गोलंदाजी करत असताना, स्टोक्सने भारतीय कर्णधाराला भोपळाही न फोडता माघारी पाठवले होते. तसेच त्याने भारतीय संघाचा डाव सावरत असलेल्या रोहित शर्माला बाऊन्सरचा भेदक मारा केला.

यावेळी त्याचा एक चेंडू रोहितच्या हेल्मेटला जाऊन धडकला. यामुळे रोहितला थोडावेळ वेदना झाल्या.  त्यानंतर अंपायरने फिजिओला बोलावून घेतले होते. परंतु त्याची दुखापत जास्त गंभीर नसल्याने त्याने पुढे फलंदाजी केली. अखेर स्टोक्सनेच त्याला ४९ धावांवर पायचित केले.

या सामन्यात रोहितने छोटेखानी पण महत्त्वाची खेळी करत बरेच विक्रम आपल्या नावे केले.  साल २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या कसोटी मालिकेत रोहितला सलामीला संधी मिळाली होती. त्यानंतर या क्रमांकावर स्वतला सिद्ध करत तो संघातील कायमचा सलामीवीर ठरला आणि अवघ्या १७ कसोटी डावात हा किर्तीमान केला. यासह कसोटीत सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याच्या विक्रमात त्याने दक्षिण आफ्रिकाचे माजी सलामीवीर ग्रीम स्मिथची बरोबरी केली आहे.

रोहितपुर्वी हर्बर्ट सुटक्लिफ यांनी सलामीला फलंदाजी करताना केवळ १३ कसोटी डावात १००० धावा केल्या होत्या. तर लेन हटननेही १६ डावात हा टप्पा गाठला होता. विशेष म्हणजे, याआधी कोणत्याही भारतीय सलामीवीराला हा पराक्रम करता आला नाही. त्यामुळे हा शानदार विक्रम करणारा रोहित पहिलाच भारतीय ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट आणि शून्य! कसोटीत ‘इतक्यांदा’ कोहली भोपळाही न फोडता झालाय बाद

विराटचा जुळा भाऊ आला अहमदाबाद कसोटी पाहायला? फोटो पाहून तुम्हीही गोंधळात पडालं

‘सूरज की बाहों में..’ गाण्यावरील चहलच्या पत्नीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल, लुटला मालदीवच्या सुंदरतेचा आनंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---