---Advertisement---

विराट आणि शून्य! कसोटीत ‘इतक्यांदा’ कोहली भोपळाही न फोडता झालाय बाद

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 2:26 PM
---Advertisement---

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना गुरुवारपासून (४ मार्च) सुरू झाला आहे. पहिला दिवस गाजवल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या दिवशी काहीसा अडचणीत आला आहे. लंचपर्यंत भारताने ८० धावांमध्ये आपले चार महत्त्वपूर्ण गडी गमावले. ज्यामध्ये कर्णधार विराट कोहली खातेही खोलू शकला नाही. शून्यावर बाद होताच विराटने एक नकोसा आकडा आपल्या नावे केला.

सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज
अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार विराट कोहली खातेही खोलू शकला नाही. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने त्याला यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. विराटने यादरम्यान ८ चेंडूंचा सामना केला.

विराट आपल्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंत १२ वेळा शून्यावर बाद झाला आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध खेळत असलेल्या संघातील सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा दुसरा क्रमांक लागतो. या यादीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा अव्वलस्थानी असून तो तब्बल ३२ वेळा आपले खाते खोलू शकला नाही.

इशांत आणि विराटनंतर या सामन्यात खेळत असणाऱ्या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांचा क्रमांक लागतो. पुजारा ९ तर रहाणे आपल्या कसोटी कारकिर्दीत ८ वेळा शून्य धावसंख्येवर तंबूत परतला आहे. याव्यतिरिक्त सध्या भारतीय संघाचा भाग असलेला मात्र या कसोटीत खेळत नसलेल्या जसप्रीत बुमराहनेही आपल्या कसोटी कारकिर्दीत ९ वेळा खाते खोलले नाही.

अजून एक लाजिरवाणा विक्रम नावावर
याबरोबरच विराटने आणखी एक अजब विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. या मालिकेमध्ये शून्यावर बाद होण्याची विराटची दुसरी वेळ आहे. कसोटी सामन्यांमध्ये शून्यावर बाद होणाऱ्यांच्या यादीमध्ये आता विराट सर्वात पहिल्या स्थानावर आहे. हा लाजीरवाणा विक्रम त्याच्या नावावर लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटचा जुळा भाऊ आला अहमदाबाद कसोटी पाहायला? फोटो पाहून तुम्हीही गोंधळात पडालं

‘सूरज की बाहों में..’ गाण्यावरील चहलच्या पत्नीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल, लुटला मालदीवच्या सुंदरतेचा आनंद

भावा १ धाव तरी काढू द्यायची! स्टोक्सच्या चेंडूवर यष्टीरक्षकाचा अप्रतिम झेल अन् कोहली तंबूत, पाहा Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---