मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडकडून पहिल्या डावात अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने शानदार दिडशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ४६९ धावांवर घोषित केला.
स्टोक्सने या डावात ३५६ चेंडूत १७६ धावा केल्या. या खेळीत त्याने १७ चौकार आणि २ षटकार मारले. स्टोक्सने मारलेल्या २ षटकारांपैकी एक षटकार अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता.
स्टोक्स १०४ धावांवर खेळत असताना ११४ व्या षटकात जोसेफ अल्झारी गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील दुसरा चेंडू फुल लेँथचा टाकला, त्यावर स्टोक्सने सरळ बॅटने मिडविकेटच्या वरुन फटका मारला. त्या फटक्यावर चेंडू थेट बाउंड्री-लाईन पार करुन गेला. हा फटका स्टोक्सने खूपच सहज मारल्यासारखा वाटला, जसे तो कॅमेरासाठी पोज देत असावा. त्याचमुळे त्याच्या या शॉटने अनेकांना चकित केले.
स्टोक्सच्या या षटकाराचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना इंग्लंड क्रिकेटने लिहिले आहे की ‘ही कोणती मस्करी होती बेन स्टोक्स?’
https://twitter.com/englandcricket/status/1284112931102306305
इंग्लंडच्या पहिल्या डावात स्टोक्स व्यतिरिक्त सलामीवीर फलंदाज डॉम सिब्लेनेही शतकी खेळी केली. त्याने ३७२ चेंडूत १२० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार मारले. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १ बाद ३२ धावा केल्या होत्या. सध्या या कसोटी मालिकेत पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकल्याने ते १-० ने आघाडीवर आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
माजी दिग्गज म्हणतो, पुजाराला माझ्या वनडे संघात खेळू दिल्या असत्या ५० ओव्हर
गौतम गंभीरने धोनीबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर आकाश चोप्रा भडकला; म्हणाला…
‘या’ भारतीय दिग्गजाची विकेट घेणे पाकिस्तानच्या युवा गोलंदाजाचे ‘स्वप्न’