इंग्लंड संघाचा अष्टपैलू बेन स्टोक्स सध्या युएईमध्ये असायला हवा होता. जेथे आयपीएल २०२० ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होत आहे. परंतु बेन स्टोक्स सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. कारण वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे तो सध्या त्याच्या कुटुंबासमवेत न्यूझीलंडमध्ये आहे. तो मागील महिन्यात पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका अर्ध्यावर सोडून न्यूझीलंडला त्याच्या आई-वडिलांकडे गेला होता.
अशा परिस्थितीत, आयपीएल २०२० मध्ये त्याच्या उपलब्धतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण बेन स्टोक्सने पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे आणि टी२० सामन्यांच्या मालिकेतही भाग घेतला नव्हता.
तरीही, आता राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल २०२० सुरू होण्यापूर्वी चांगली बातमी आली आहे की बेन स्टोक्सने सराव सुरू केला आहे. परंतु तो अजूनही न्यूझीलंडमध्येच आहे. क्राइस्टचर्चमध्ये जन्मलेल्या बेन स्टोक्सने क्रिकेटमध्ये परत येण्याची तयारी सुरू केली आहे. तुफानी फलंदाज स्टोक्स सध्या गोलंदाजीचा सराव करीत आहे.
स्टोक्सच्या मैदानावरील पुनरागमनाने असे संकेत दर्शवित आहेत की, तो लवकरच युएईला जाईल आणि राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल २०२० स्पर्धेत सामील होईल. आयपीएल २०२० मध्ये स्टोक्सला राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक १२.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
आपल्या इंस्टाग्रामवर सरावाचा व्हिडिओ पोस्ट करताना स्टोक्सने सांगितले की, “क्राइस्टचर्चमध्ये सरावाला सुरुवात. मी सिडनहॅम क्रिकेट क्लबचे आभार मानतो, ज्याने मला आपल्या सुविधा वापरण्याची परवानगी दिली.”
https://www.instagram.com/p/CFQ_orzl2Ni/?utm_source=ig_web_copy_link
खरंतर या व्हिडिओमध्ये बेन स्टोक्सने एका फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं आहे. अशा परिस्थितीत राजस्थानच्या संघासाठी हे चांगले आहे की आयपीएलपूर्वी तो आपली लय मिळवत आहे. राजस्थान रॉयल्सबद्दल सांगायचे तर आयपीएल २०२० मधील संघाचा पहिला सामना २२ सप्टेंबरला आहे, तर दुसरा सामना २७ सप्टेंबरला आहे. अशा परिस्थितीत बेन स्टोक्स पहिल्या सामन्यात तर नाही, परंतु दुसर्या सामन्यात संघाचा भाग होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
-दीपक चाहराने १५ वर्षांचा जुना फोटो केला शेअर; शेन वॉट्सनसाठी दिला ‘हा’ खास संदेश
-आयपीएलचा पहिला सामना कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर
-‘हा’ गोलंदाज मलिंगाची कमतरता पूर्ण करेल;ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने सांगितले नाव
ट्रेंडिंग लेख-
-जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्स पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल
-जेव्हा जेव्हा चेन्नई पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी