कुटुंबाशी निगडीत वृत्त छापल्याने बेन स्टोक्सने ब्रिटिश वृत्तपत्राला फटकारले

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने द सन या एका ब्रिटीश वृत्तपत्रावर जोरदार टिका केली आहे. या वृत्तपत्राने त्याच्या कुटुंबाबाबत एक वृत्त छापल्याने त्याने मंगळवारी एक ट्विट करत या वृत्तपत्रावर राग व्यक्त केला आहे.

द सन या वृत्तपत्राने स्टोक्सच्या कुटुंबाबाबत भूतकाळात घडलेल्या काही घटनांबद्दल वृत्त छापले आहे. यामध्ये स्टोक्सच्या आईच्या पहिल्या नवऱ्याने स्टोक्सच्या सावत्र भाऊ आणि बहिणीची हत्या केली होती. ज्यावेळी हत्या करण्यात आली त्यावेळी स्टोक्सचा जन्म झाला नव्हता. याबद्दलचे वृत्त छापले आहे. या दु:खद घटनेची स्टोक्सने कधीही वाच्चता केली नव्हती.

पण या दु:खद घटनेबद्दल बातमी छापून आणल्याने स्टोक्सने द सन या वृत्तपत्राला फटकारले असून हे सर्व असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे.

स्टोक्सने ट्विटमध्ये लिहिलेल्या संदेशानुसार या वृत्तपत्राने एका पत्रकाराला न्यूझीलंडमध्ये स्टोक्सच्या आई-वडीलांच्या घरी पाठवले होते.

तसेच स्टोक्सने लिहिले आहे की ‘या दु:खद घटनेला विसरण्यासाठी माझ्या कुटुंबाला अनेक वर्षे लागली आहेत. या दु:खद घटना वैयक्तिक असल्याने त्या खाजगीत ठेवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला आहे.’

त्याचबरोबर स्टोक्सने ही खालच्या स्तराची पत्रकारिता असल्याचे म्हटले आहे, जी वैयक्तिक पातळीवर याचा काय परिणाम होईल याचा विचार न करता केवळ त्यांचा खप वाढावा याकडे लक्ष केंद्रित करत आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित शर्माने कसोटीत ओपनिंग करण्यावर या माजी क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

स्टिव्ह स्मिथ-जॅक लीचचा हा खास फोटो होतोय जोरदार व्हायरल…

विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ कोण आहे सर्वोत्तम? सौरव गांगुली दिले ‘हे’ उत्तर

You might also like

Leave A Reply